नागपूर -शहरातील अजनी पोलीस ठाण्यांतर्गत कुकडे लेआऊट परिसरातील इयत्ता चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीसोबत शाळेत अश्लील चाळे आणि छेडछाड केल्याची घटना समोर आली आहे. प्रकरणातला आरोपी त्याच विद्यार्थिनीच्या शाळेतील संगीत शिक्षक आहे. आरोपीचे नाव जॉन टिमूटी असून तो कुकडे लेआऊट परिसरातील शाळेत संगीत विषयाचा शिक्षक आहे.
संतापजनक.. चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीसोबत संगीत शिक्षकाचे अश्लील चाळे - Student molestation in Nagpur
शहरातील अजनी पोलीस ठाण्यांतर्गत कुकडे लेआऊट परिसरातील इयत्ता चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थिनी सोबत शाळेत अश्लील चाळे आणि छेडछाड केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणातील आरोपी त्याच विद्यार्थिनीच्या शाळेतील संगीत शिक्षक आहे.
विद्यार्थिनीवर संगीत शिक्षकाने केले अश्लील चाळे
तो पीडित विद्यार्थिनीला रिकाम्या वर्गखोलीत नेऊन तिच्या सोबत अश्लील चाळे करायचा. वारंवार असे होऊ लागल्यानंतर पीडित विद्यार्थिनीने सर्व घटना तिच्या पालकांना सांगितली. त्यानंतर पालकांनी अजनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपी शिक्षक जॉन टिमूटीला अटक केली असून घटना उजेडात आल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. आरोपी शिक्षकाने आणखी काही विद्यार्थिनी सोबत असे अश्लील चाळे केले आहे, का याचा शोध पोलीस घेत आहे.