महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अनैसर्गिक कृत्याला कंटाळून मित्राने केली मित्राची हत्या - नागपूर मित्राने केली मित्राची हत्या

राजू हा देवांश सोबत अनैसर्गिक कृत्य करण्याचा सातत्याने प्रयत्न करत होता. राजू आणि देवांश एकाच खोलीत राहत असल्याने तो देवांशची नेहमीच छेड काढण्याचा प्रयत्न करायचा. देवांशला त्याचे अश्लील वर्तन सहन होत नसल्याने तो वारंवार त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होता.

मित्राची हत्या
मित्राची हत्या

By

Published : Aug 9, 2021, 9:55 PM IST

Updated : Aug 9, 2021, 10:03 PM IST

नागपूर -कामा निमित्याने एकत्र राहत असलेल्या दोन मित्रांपैकी एक मित्र नेहमी अश्लील वर्तन करत असल्याच्या रागातून दुसऱ्या मित्राने त्याची हत्या केल्याची घटना नागपूर शहरातील गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दाभा परिसरात घडली आहे. राजू नागेश्‍वर असे मृतकाचे नाव आहे. तर देवांश वाघाडे असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी देवांशला अटक केली आहे.

अनैसर्गिक कृत्याला कंटाळून मित्राने केली मित्राची हत्या

मृतक राजू हा देवांश सोबत अनैसर्गिक कृत्य करण्याचा सातत्याने प्रयत्न करत होता. राजू आणि देवांश एकाच खोलीत राहत असल्याने तो देवांशची नेहमीच छेड काढण्याचा प्रयत्न करायचा. देवांशला त्याचे अश्लील वर्तन सहन होत नसल्याने तो वारंवार त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होता. मात्र राजू हा देवांशला अधिकच त्रास देत देऊ लागला होता. काल रात्री (रविवारी) काम आटोपल्यानंतर देवांश झोपला असताना राजूने पुन्हा त्याच्याशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतापलेल्या देवांशने रागाच्या भरात लोखंडी रॉडने राजूच्या डोक्यावर वार केला. ज्यामध्ये राजुचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर राजुचा मृतदेह गॅरेज मागील मैदानात फेकून दिला. मात्र सकाळी राजुचा मृतदेह परिसरातील लोकांना दिसला असता याबाबत गिट्टीखदान पोलीस ठाण्याला माहिती कळवण्यात आली. पोलीस घटनास्थळी आल्यानंतर तो मृतदेह राजूचा असल्याची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी राजुच्या सहकाऱ्यांची चौकशी केली असता देवांशने खून केल्याची कबुली दिली आहे.

अनैसर्गिक कृत्याची सवय जडली होती

मध्यप्रदेशच्या बालाघाट येथे राहणारा राजू नागेश्‍वर हा काही महिन्यांआधी काम करण्यासाठी नागपुरात आला होता. आधी तो बांधकाम साईटवर काम करायचा. एक महिन्याआधी तो दाभा ते गणेशनगर दरम्यान असलेल्या आशिष दुर्गे यांच्या गॅरेजमध्ये काम करत होता. त्याच्यासोबत देवांश वाघाडे हा देखील काम करायचा. दोघेही गॅरेजमध्येच एका खोलीत राहायचे. राजू हा व्यसनाधिन होता. सोबतच त्याला सहकार्यासोबत अश्लील वर्तन करण्याची सवय जडली होती.

हेही वाचा -नागपुरात पोलीस आयुक्तांच्याच नावाने फेक फेसबुक अकाउंट; गुन्हेगाराने केली पैशांची मागणी

Last Updated : Aug 9, 2021, 10:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details