नागपूर- काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानावर झालेल्या हल्ला प्रकरणी प्रकरणी मुंबई पोलिसांनी नागपुरातून संदीप गोडबोले नावाच्या बडतर्फ एसटी कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले आहे.
Silver Oak Attack Case : मुंबई पोलिसांनी नागपुरातून एकाला ताब्यात घेतल; नागपूर कनेक्शन उघड - हल्ला प्रकरणातील नागपूर कनेक्शन
संदीप गोडबोले हा वकील गुणवंत सदावर्ते यांच्या सोबत त्यादिवशी संपर्कात असल्याच्या माहितीवरून मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. संदीप गोडबोलेला मुंबई पोलीस घेऊन गेले आहे. यासंदर्भात अधिक माहिती उपलब्ध झालेली नसल्याची माहिती शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे.
नागपूर पोलीस आयुक्त
सिल्वर ओकवर हल्ला झालेल्या दिवशी संदीप गोडबोले हा वकील गुणवंत सदावर्ते यांच्या संपर्कात होता. या माहितीवरून मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. संदीप गोडबोलेला मुंबई पोलीस घेऊन गेले आहे. यासंदर्भात अधिक माहिती उपलब्ध झालेली नसल्याची माहिती शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे.