नागपूर -दिल्लीमध्ये हनुमान चालीसा पठण केले, पण कुठलाही विरोध केला नाही. उलट तिथे मोठ्या प्रमाणात सुरक्षा सुविधा पुरवण्यात आली. दिल्ली सरकारने मोठ्या प्रमाणात सहकार्य केले, त्यासाठी त्यांचे धन्यवाद करते. मात्र, महाराष्ट्रात हनुमानजींना एवढा विरोध का?, असा सवाल खासदार नवनीत राणांनी उपस्थित केला आहे. तसेच, महाराष्ट्राला लागलेला शनी दूर झाला पाहिजे, यासाठी हनुमान चालीसा पठण करणार असल्याचेही नवनीत राणांनी म्हटले ( Navneet Rana Taunt Cm Uddhav Thackeray ) आहे.
जेलमध्ये टाकण्याचा एकसूत्री कार्यक्रम - रवी राणा यांनी म्हटले की, महाराष्ट्रात आल्यानंतर सरकारची झोप उडते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पोलिसांच्या माध्यमातून जो हनुमानचे नाव घेतील त्याला जेलमध्ये टाकण्याच्या एकसूत्री कार्यक्रम चालवलेला आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. येणाऱ्या काळात हनुमान भक्त या मुख्यमंत्र्यांना धडा शिकवेल.