नागपूर -गेल्यावर्षी पिण्याच्या पाण्याची कमतरता भासल्यानंतर वर्धा जिल्ह्यात जलसंवर्धनाचे अनेक महत्वपूर्ण कामे पूर्ण झाली आहेत. त्यापैकीच एक म्हणजे तामसवाडा पॅटर्नवर आधारित मोती नाला जलसंवर्धन प्रकल्प आहे. वर्धा तालुक्यातील परसोडी, उमरी, टेंभरी, मांडवा, पुलई, बेलगाव या गावांमधून मोती नाला वाहतो. मात्र गेल्या काही वर्षांपासून हा नाला मृतप्राय झाला होता. त्यामुळे हजारो हेक्टर शेती संकटात आली होती. शिवाय पावसाळ्यात मोती नाल्याला पूर देखील येत असल्याने समाजसेवक सुनील गफाट आणि ग्रामस्थांनी मिळून या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदन सादर केले होते. गडकरींनी देखील या निवेदनाची तातडीने दखल घेऊन जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT) च्या सीएसआर अंतर्गत निधी उपलब्ध करून दिला. ज्यामुळे आज हा मोती नाला पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. जल-भुवैज्ञानिक यांच्या मार्गदर्शनाखाली मोती नाल्याचे खोलीकरण केल्यानंतर तामसवाडा पॅटर्नवर आधारित मोती नाला येथे जलसंवर्धन करण्याच्या उद्देशाने एक बंधारा बांधण्यात आला आहे. ज्याचे निरीक्षण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.
मोती नाला सुमारे नऊ किलोमीटर लांबीचा आहे. मोती नाला आणि उपनाल्यांवर जलसंवर्धनाचे कार्य करण्यात आले आहे. त्यातून मोती नाल्याच्या पात्रांमध्ये सुमारे 280 सहस्त्र घनमीटर (280-TMC) एवढा भूपृष्ठीय जलसाठा तयार झाला आहे. या भूपृष्ठीय जलसाठ्यामुळे वार्षिक पुनर्भरण योगदान दर दरवर्षी सुमारे 620 सहस्त्र घन मीटर एवढे भूजल समृद्ध झाले आहे. या भूजल पुनर्भरण आतून जमिनीत पावसाच्या सहाशे सहस्त्र घनमीटर अर्थात सुमारे 60 कोटी लिटर पाणी भूजलात दरवर्षी प्राप्त होणार आहे. याचा शेतीला मोठा फायदा होईल.
वेगळ्या पद्धतीचा बंधारा