नागपूर -देशात सर्वात महाग सीएनजी नागपूरात मिळत आहे. नागपुरात आज सीएनजीच्या दरांमध्ये अचानक सहा रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे नागपुरात सीएनजीचे दर ११६ रुपये प्रति किलो पर्यत गेले आहेत.
सीएनजीचे दर वाढले - पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे इंधनाचा स्वस्त पर्याय म्हणून सीएनजीकडे पाहिले जात होते. मात्र, सीएनजीच्या दरातही मोठी वाढ झाल्याने नागपुरातील सीएनजीचे दर महाराष्ट्रातच नाही तर देशात सर्वाधिक ठरले आहेत. त्यातही नागपुरात सीएनजीचे तीन पंप असून सध्या फक्त एकाच पंपावरच सीएनजी उपलब्ध आहे.
हेही वाचा -Complaint Filed Against CM : औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री शिंदेंविरोधात पोलिसांत तक्रार; 'हे' आहे कारण
...म्हणून सीएनजी महाग झाल्याचे करण दिले जातेय -नागपुरात सीएनजीचा पुरवठा करणाऱ्या हरियाणा गॅस कंपनीने आज सीएनजीच्या दरात सहा रुपयांची वाढ जाहीर केली आहे. त्यामुळे आता नागपूरात सीएनजीचे दर प्रति किलो 116 रुपये झाले आहे. जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे एलएनजीच्या उपलब्धतेत अडचण असल्यामुळे आणि नागपुरात पुरवठादाराकडून एलएनजी आणून त्याचे रूपांतरण सीएनजी मध्ये केले जात असल्यामुळे सीएनजीच्या पुरवठ्यामध्ये अडचणी निर्माण झाल्याची माहिती आहे.
हेही वाचा -Aaditya Thackeray Kolhapur Tour : अन् स्टेज सोडून थेट जनतेतून आदित्य ठाकरेंचे दमदार भाषण; पाहा व्हिडिओ