महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ५ दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर,असे असेल राज यांचे शेड्यूल - राज यांच्या दौऱ्याचे शेड्यूल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेना गटानेसुद्धा विदर्भ दौरा आखला आहे (schedule of Raj Thackeray Vidarbha tour). आता या यादीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सुद्धा भर पडली आहे. येत्या १८ सप्टेंबरपासून ५ दिवस राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर येणार आहेत (Raj Thackeray visit Vidarbha for 5 days). याबाबत अधिकृत घोषणा लवकर केली जाईल.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ५ दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे ५ दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर

By

Published : Sep 10, 2022, 3:02 PM IST

नागपूर -राज्याच्या सत्तेचा मार्ग विदर्भातूनचं जातो की काय समज आता राजकीय पक्षांचा झालेला दिसतो आहे. असे म्हणण्यामागे कारणही तसे विशेष आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेना गटानेसुद्धा विदर्भ दौरा आखला आहे. आता या यादीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सुद्धा भर पडली आहे. येत्या १८ सप्टेंबरपासून ५ दिवस राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर येणार आहेत. याबाबत अधिकृत घोषणा लवकर केली जाईल. मात्र, कार्यकर्ते उत्साही झाले असून कामाला लागले आहेत.

राज यांच्या दौऱ्याचे शेड्यूल -१८तारखेला नागपूरला आल्यानंतर दोन दिवस (१८,१९) नागपूरच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर २० सप्टेंबरला राज ठाकरे चंद्रपूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तिथेसुद्धा कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन त्यांचे मार्गदर्शन करतील अशी माहिती आहे. २१ सप्टेंबरला चंद्रपूरवरून अमरावतीला रवाना होतील. २१ आणि २२ सप्टेंबर रोजी ते अमरावती येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करतील. त्यानंतर ते २२ सप्टेंबरला रात्री अमरावती येथून मुंबईकडे प्रयाण करतील. असा दौरा निश्चित झाला असला तरी चंद्रपूर आणि अमरावतीच्या दौऱ्यात बदल होण्याची शक्यता आल्याचं मत मनसेचे नेते हेमंत गडकरी यांनी सांगितले आहे.



विदर्भाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही -राजकीयदृष्ट्या महत्वाचा प्रदेश असलेल्या विदर्भाकडे आजपर्यंत अनेक राजकीय पक्षांनी दुर्लक्ष केले. एवढेच नाही तर सोयीचे राजकारण केल्यामुळे अनेक पक्षांना विदर्भात तग धरताच आला नाही. ही चूक आता अनेकांच्या लक्षात आली आहे. त्यामुळेच सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी विदर्भाकडे लक्ष केंद्रित केले आहे.

आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून -येत्या काळात विदर्भात नागपूर, चंद्रपूर आणि अमरावती महानगर पालिकेच्या निवडणुकांची घोषणा होणार आहे. या निवडणूकीच्या माध्यमातून राजकीय पक्ष आपली जमीन तयार करण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याकडे बघितले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details