महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

MLC Election Result 2021 : नागपूरसह अकोल्यातही भाजपचा विजय, काँग्रेसची मतं फुटली

विधानपरिषदेच्या निडणुकीत नागपूरच्या जागेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा विजय झाला आहे. तर काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख (Mangesh Deshmukh) यांचा पराभव झाला आहे. तर, अकोल्यातून भाजपचे उमेदवार वसंत खंडेलवाल यांचा 110 मतांनी विजय झाला आहे. सेनेचे बाजोरिया यांना 331 तर भाजपचे उमेदवार खंडेलवाल याना 441 मते मिळाली आहेत.

By

Published : Dec 14, 2021, 9:44 AM IST

Updated : Dec 14, 2021, 10:24 AM IST

MLC Election Result 2021 : नागपूरसह अकोल्यातही भाजपचा विजय, काँग्रेसची मतं फुटली
MLC Election Result 2021 : नागपूरसह अकोल्यातही भाजपचा विजय, काँग्रेसची मतं फुटली

नागपूर: विधानपरिषदेच्या निडणुकीत नागपूरच्या जागेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांचा विजय झाला आहे. तर काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख (Mangesh Deshmukh) यांचा पराभव झाला आहे. बावनकुळे यांना 362 मते मिळाली आहेत. तर काँग्रेस पुरस्कृत उमेदवार देशमुख यांना 186 मते मिळाली आहेत. तर, छोटू भोयर यांना फक्त 1 मत मिळाल्याचे समोर आले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी 278 मतांचा कोटा पूर्ण केला आहे.

बावनकुळे यांना 362 मते मिळाली आहेत.

नागपूरच्या जागेवर भाजपने चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांना संधी दिली होती. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विजयसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विजयासाठी आपल्या स्तरावर काम केले होते. बावनकुळे यांना 362 मते मिळाली आहेत. तर, काँग्रेस उमेदवाराला 186 मत मिळाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, महाविकास आघाडीची मते फुटल्याचे समोर आले आहे.

अकोल्यातही भाजपचा विजय

अकोल्यातून भाजपचे उमेदवार वसंत खंडेलवाल यांचा 110 मतांनी विजय झाला आहे. सेनेचे बाजोरिया यांना 331 तर भाजपचे उमेदवार खंडेलवाल याना 441 मते मिळाली आहेत.

अकोला विधान परिषद - मिळालेली मते

भाजप - 443

सेना - 334

वैध - 777

बाद - 31

Last Updated : Dec 14, 2021, 10:24 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details