नागपूर- बजरंगबलीसारखा छाती फाडून दाखवू शकत नाही की कोणाला मतदान केले आणि कोणाला नाही. मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार मतदान केले. पण, मी संजय राऊत ( MP Sanjay Raut ) यांचे काही खाल्ले नाही. त्यामुळे आम्हाला गद्दार म्हणायचा राऊत यांना काहीच अधिकार नाही, अशी प्रतिक्रिया अपक्ष आमदार देवेंद्र भुयार ( MLA Devendra Bhuyar ) यांनी मांडली संजय राऊत यांनी गद्दारी असल्याचा आरोप केला होता. नागपूर विमानतळावर मुंबईला रवाना होण्यापूर्वी माध्यमांशी बोलत होते.
सुरुवातीपासून महाविकास आघाडीसोबत होतो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार मतदान केले. पण, अशा पद्धतीने आरोप होत असेल तर चुकीचे आहे. आज शरद पवार यांनी वेळ दिली आहे. त्यांना भेटण्यासाठी मुंबईला चाललो आहे, असे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार म्हणाले. शिवसेनेचे नेते संजय राऊत निवडणुकीनंतर महाविकास आघाडी सोबत आले. पण, मी त्यांच्या आधीपासूनच महाविकास आघाडीसोबत आहेत. त्यामुळे गद्दार हा शब्द आम्हाला लागू होत नाही. पहिले मत मी संजय पवारांना दिले तर दुसऱ्या पसंतीची मते संजय राऊत यांना दिले. आता मी हे काही छाती फाडून दाखवू शकत नाही. पण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेप्रमाणे मी हे मतदान केल्याचेही देवेंद्र भुयार यांनी सांगितले.
खासदार संजय राऊत यांनी 'असा' तर्क लावला असावा -संजय पवार मागे पडले असेल तर त्यात दोष आमचा नाही. तेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातील नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे संजय राऊत यांनी माझ्यावर आरोप केला असेल तर ते चुकीचे आहे. माझ्या मतदारसंघात झुंज प्रकरणात लोक मृत्युमुखी पडले आणि मुख्यमंत्र्यांनी दखलही घेतली नाही. मी वारंवार फोन लावले पण उत्तर मिळाले नाही. त्यामुळे ही नाराजी बोलून दाखवली होती. खासदार संजय राऊत यांनी नाराज असल्याचा तर्क लावला. याबाबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वेळ दिली असून या संदर्भात चर्चा करण्यासाठी मुंबईला जात असल्याचे आमदार भुयार यांनी सांगितले.