नागपूर - पोपटाचा धंदा माझा नाही, देवेंद्र फडणवीस यांचा पोपट चिठ्ठ्या काढतो आणि ते भविष्यवाणी करण्याचं काम करतात त्यामुळे नवाब मलिक पोपट होऊ शकत नाही, असा पलटवार अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे. ते नियोजित बैठकीसाठी गोंदियाला जात असताना नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी एसीबीच्या कारवायांवर टीका केली.
देवेंद्र फडणीस यांनी समीर वानखेडे प्रकरणावर ते दिवसभर बोलत असतात. मलिक यांनी समीर वानखेडे हा भाजपचा पोपट आहे, असे म्हटले होते. यावर नवाब मलिक हे पोपट असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यालाच नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर देत माझा पोपटाचा धंदा नाही, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
एनसीबीच्या अधिकाऱ्यांकडून सातत्याने अशा पद्धतीने कारवाया करत शंभरपेक्षा अधिक लोकांना 26 खोट्या केसमध्ये अडकवले आहे. एनसीबीचे अधिकारी फर्जिवडा केसेस करून हजारो कोटी खंडणी वसुली करण्याचे काम करत असल्याचाही आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. त्यामुळे लोकांना होत असलेल्या त्रासाबद्दल अधिकाऱ्यांच्या खोट्या कारवाईंना थांबवण्याचे काम माझे आहे. ते कर्तव्य म्हणून मी शेवटपर्यंत पार पाडणार, असेही माध्यमांशी बोलताना नवाब मलिक यावेळी म्हणाले.
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे ही वाचा -पुणे पोलीस किरण गोसावीला घेऊन मुंबईत; घराची, कार्यालयाची करणार तपासणीमलिक म्हणाले की, अनुराग कश्यप यांनी ही त्यांना झालेल्या त्रासाबद्दल पुढे येऊन बोलून दाखवले आहे, त्यामुळे येत्या काळात आणखी काही लोक पुढे येतील. तसेच जे अधिकारी लोकांना खंडणी आणि कारवाईची भीती दाखवून खंडणी वसूल करत होते. तेच लोक आता स्वतःला अटक होण्याच्या भीतीमध्ये दिसून पडत आहेत. एनसीबीच उपमहासंचालक्ष ज्ञानेश्वर सिंह यांनी या प्रकरणात सखोल चौकशी करावी तसेच निरपेक्षपणे चौकशी करून समीर वानखेडे यांच्यावर तसेच एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणार असून त्यासंदर्भात एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंग यांना पत्र लिहिणार असल्याचेही राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यावेळी म्हणाले.वानखेडे यांनी आतापर्यंत 4 ग्रामच्यावर ड्रग जप्त केली नाही - समीर वानखेडे यांनी आतापर्यंत केलेल्या कारवाईमध्ये केवळ 2 ते 5 ग्राम ड्रग जप्तीच्या कारवाया केली आहे. तसेच वानखेडे यांनी एका प्रकरणात वर्षभरापूर्वी गुन्हा दाखल केला. त्यात कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामध्ये चित्रपट जगतातील 30 लोकांना चौकशीसाठी बोलावण्यात आले असून एकालाही अटक झाली नाही. त्यामुळे अशा कारवाया खंडणीसाठी वापर करत असल्याने त्याचीच चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी तसेच एनसीबीचे उपमहासंचालक यांना करणार असल्याचे नावब मलिक यावेळी म्हणाले. समीर वानखेडेच्या कुटुंबावर वैयक्तिक टीका करत असल्याचा आरोपावर मलिक म्हणाले की, मी त्यांच्यावर वैयक्तिक आरोप केले नाहीत. ते दलित नसून एका शेड्युल कास्ट मुलाचा अधिकार हिसकावला आहे. त्यांच्या वडिलांनी धर्मांतर करून लग्न केले आहे. जन्माच्या दाखल्यातही दाऊद समीर वानखेडे असा उल्लेख आहे. समीर वानखेडे यांनी एससी, एसटी कमिशनला खोटे आरोप होत असल्याने कारवाईची मागणी केली, पण तो अधिकार ते दलित नसल्याने नाही. त्याचे सर्टिफिकेट बोगस असल्याने त्यांनीही चौकशी केली पाहिजे.विधानमंडळात कोणत्या नेत्यांचे कोणाशी संबध आहे ते स्पष्ट करणार -यात भाजपच्या मोठ्या नेत्याचा एक माणूस रोज समीर वानखेडे यांच्या एनसीबीच्या कार्यलयात जात आहे. त्यामुळे त्यावर मी बोललो आहे. पण येत्या हिवाळी अधिवेशनात कोणत्या नेत्यांचे कोणाशी काय संबंध आहे, हे विधांमंडळात गौफ्यस्फोट करणार असल्याचे म्हणत नवाब मलिक यांनी इशारा दिला आहे.