महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पुनर्रचनेची प्रक्रिया सहा महिन्यात पूर्ण करून निवडणूक आयोग निवडणूक जाहीर करेल - विजय वडेट्टीवार - वडेट्टीवार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर

लोकसंख्येनुसार वार्डाच्या पुनर्रचनेचे अधिकार पूर्वी राज्य सरकारकडे होते. पण 1994 नंतर हेच अधिकार निवडणुका आयोगाला हे देण्यात आले होते. आता नवीन वार्डाची पुनर्रचना करण्याची प्रक्रिया सहा महिन्याच्या आत पूर्ण करण्याचा प्रयत्न असून त्यानंतर निवडणूक आयोग निवडणुकीच्या तारखेची घोषणा करेल असेही मंत्री वडेट्टीवार ( Vijay Wadettiwar About Election Commotion ) म्हणाले

Minister Vijay Wadettiwar
विजय वडेट्टीवार

By

Published : Mar 12, 2022, 4:50 PM IST

Updated : Mar 12, 2022, 5:27 PM IST

नागपूर - स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका घेण्यासाठी वार्डाच्या पुनर्रचना करण्याचे अधिकार विधेयकावर स्वाक्षरी झाल्याने अधिकार राज्य सरकारकडे आल्याचे राज्याचे बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते. लोकसंख्येनुसार वार्डाच्या पुनर्रचनेचे अधिकार पूर्वी राज्य सरकारकडे होते. पण 1994 नंतर हेच अधिकार निवडणुका आयोगाला हे देण्यात आले होते. आता नवीन वार्डाची पुनर्रचना करण्याची प्रक्रिया सहा महिन्याच्या आत पूर्ण करण्याचा प्रयत्न असून त्यानंतर निवडणूक आयोग निवडणुकीच्या तारखेची घोषणा करेल असेही मंत्री वडेट्टीवार ( Vijay Wadettiwar About Election Commotion ) म्हणाले.

विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया

यात निवडणुकांसाठी वार्डाची पुनर्रचना करण्याच्या कामाला किमान सहा महिन्याचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे या निवडणुका पुनर्रचना प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत निवडणुका पुढे जातील अशी शक्यता असल्याचेही असे मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले.

उर्जाखात्याला निधी कमी मिळाला?

अर्थसंकल्पात उर्जाखात्याला कमी निधी मिळल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. यावर उत्तर देताना मंत्री विजय वडेट्टीवार यांनी निधी कमी मिळाल्याचे मान्य केले. पण ऊर्जा विभागाबद्दल मला जास्त माहित नाही. पुरवणी मागणी करून अधिकचा निधी मागता येईल असे म्हणाले. तेच दुसरीकडे जे या खात्याचे मंत्री आहेत त्यांनी अर्थसंकल्प ऊर्जा देणारा आहे, म्हटले असल्याने त्यांचाकडुन मात्र कमी निधी मिळाल्याची नाराजी बाहेर आली नसती तरी अंतर्गत खदखद सुरू झाल्याचे दिसून येत आहे.

'तोपर्यंत महाविकास आघाडी टिकेल'

भाजपला विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांना महराष्ट्रात सत्ता आणू असे म्हटले, यावर उत्तर देताना वडेट्टीवार यांनी टोला हाणत म्हणाले की प्रत्येक पक्षाला वाटत असते की तेही सत्तेत आले पाहिजे. अगदी 2 सदस्य असले तरी त्यांनी सरकारमध्ये सहभागी व्हायचे असते. मात्र जोपर्यंत महाविकास आघाडी सरकारमधील पक्ष एकत्रित आहे, यातून एक पक्ष सरकारमधून बाहेर पडत नाही तोपर्यंत महाविकास आघाडीचे सरकार स्थिर आहे. निकटच्या भविष्यात असे काही होईल असे मला वाटत नाही असेही मंत्री विजय वडेट्टीवार म्हणालेत.

हेही वाचा -फडणवीसांसाठी स्टिंग ऑपरेशन केल्याचा आरोप.. तेजस मोरेवर आहे खंडणीचा गुन्हा.. 'जळगाव' कनेक्शन उघड

Last Updated : Mar 12, 2022, 5:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details