महाराष्ट्र

maharashtra

नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना ऊर्जा मंत्र्यांची 'दिवाळी भेट'

By

Published : Nov 14, 2020, 4:32 PM IST

महावितरणमध्ये नोकरीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना येत्या आठ दिवसांमध्ये नोकरीत सामावून घेणार असल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिली आहे. यामध्ये पाच हजार विद्युत सहाय्यक, दोन हजार उपकेंद्र सहाय्यक आणि ४१२ शाखा अभियंत्यांचा समावेश आहे.

minister of power nitin raut
नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना ऊर्जा मंत्र्यांची 'दिवाळी भेट'

नागपूर - महावितरणमध्ये नोकरीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना येत्या आठ दिवसांमध्ये नोकरीत सामावून घेणार असल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिली आहे. यामध्ये पाच हजार विद्युत सहाय्यक, दोन हजार उपकेंद्र सहाय्यक आणि ४१२ शाखा अभियंत्यांचा समावेश आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना गोड जाणार असल्याचे चित्र आहे. या विषयावरून काही दिवसांपूर्वी माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आंदोलन केले होते.

नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना ऊर्जा मंत्र्यांची 'दिवाळी भेट'

पाच हजार विद्युत सहाय्यक, दोन हजार उपकेंद्र सहाय्यक आणि ४१२ शाखा अभियंत्यांची परीक्षा झाल्यानंतर इतर सर्व प्रक्रिया पूर्ण झाली होती. मात्र तांत्रिक कारणामुळे या सर्व उमेदवारांना नोकरीत सामावून घेण्यात आले नव्हते. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने आंदोलनाची भूमिका घेतली होती. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील दोन वेळा निवेदन देण्यात आले. या प्रक्रियेला वेळ लागत होता. त्यामुळे या उमेदवारांना दिवाळीची भेट देण्याच्या उद्देशाने त्यांना येत्या आठ दिवसांत नोकरीत सामावून घेणार असल्याची माहिती ऊर्जामंत्र्यांनी दिली.

प्रकरण न्यायालयात गेल्याने उशीर

उमेदवारांना नोकरीत सामावून घेण्याची प्रक्रिया वादात अडकली होती. त्यामुळे प्रकरण न्यायालयात गेल्याने उशीर झाल्याचं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मान्य केलं आहे. या विलंबाची भरपाई करण्याच्या उद्देशाने दिवाळी भेट म्हणून नियुक्ती पत्र देऊन नोकरीत सामावून घेणार असल्याचे ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details