नागपूर - देशभरात दोनशेच्यावर कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत महानगर असलेल्या मुंबई, पुणे, नागपूरमध्ये देखील अत्यावश्यक वस्तू सोडून इतर सर्व दुकाने बंद करण्याचे आवाहन राज्य शासनातर्फ़े करण्यात आले आहे. दरम्यान, लॉकडाऊनची परिस्थिती सध्या शहरात नसून त्यासंदर्भात चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे.
'परिस्थितीचा आढावा घेऊन शहर लॉकडाऊनबद्दल चर्चा करून निर्णय घेतला जाईल' - नागपूर शटडाऊन
देशभरात दोनशेच्यावर कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
नितीन राऊत, पालकमंत्री
इतर जिल्ह्यातील आढावा आणि माहिती घेऊन लॉकडाऊनबद्दल चर्चा केली जाईल. आवश्यकता असेल तर तसा निंर्णय घेतला जाईल, असेही मंत्री नितीन राऊत यांनी सांगितले आहे.