महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Nitin Gadkari : चिमणपाखरांनो! दु:ख विसरुन आकाशी झेप घ्या, शासन कायम तुमच्या पाठिशी; नितीन गडकरी - नितीन गडकरी मराठी बातमी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ( PM Narenra Modi ) यांच्या मार्गदर्शनानंतर जिल्ह्यातील अनाथ बालकांशी नितीन गडकरी यांनी संवाद साधला. तेव्हा निराश न होता पुढील मार्गक्रमण करा, आकाशी झेप घ्या, असे भावनिक आवाहन गडकरींनी ( Minister Nitin Gadkari ) केले.

Nitin Gadkari
Nitin Gadkari

By

Published : May 30, 2022, 4:05 PM IST

नागपूर -तुमच्या आयुष्यात झालेली दुर्घटना जीवनात अंध:कार निर्माण करणारी आहे. मात्र, यातून सकारात्मकवृत्तीने बाहेर पडणे आवश्यक आहे. शासन तुमच्या कायम पाठिशी आहे. निराश न होता पुढील मार्गक्रमण करा, आकाशी झेप घ्या, असे भावनिक आवाहन केंद्रीय महामार्ग व दळणवळण मंत्री नितीन गडकरी ( Minister Nitin Gadkari ) यांनी केले आहे. कोरोना महामारीमध्ये ज्यांचे आई-वडील मृत्यूमुखी पडले, अशा अनाथ बालकांसोबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ( PM Narenra Modi ) यांनी आज ( 30 मे ) स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव कार्यक्रमातंर्गत ऑनलाईन संवाद साधला. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनात महिला व बाल कल्याण विभागाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनानंतर जिल्ह्यातील अनाथ बालकांशी गडकरी यांनी संवाद साधला. नागपूर जिल्ह्यात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संख्या 79 आहे. त्यांना आज जिल्‍हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात पंधरा लाखाचे पॅकेज नितीन गडकरी यांच्या हस्ते देण्यात आले.

निराशेतून प्रकाशाकडे नेणारी योजना - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अतिशय जिव्हाळ्यातून ही योजना आणली आहे. मुलांना त्यांच्यासोबत घडलेल्या अघटीतातून बाहेर काढण्यासाठी, निराशेतून प्रकाशाकडे नेण्यासाठी, संकटावर मात करुन यशस्वी होण्यासाठी, अतिशय बारकाईने ही योजना आखण्यात आली आहे. कोणत्याच निराधराला शासन दुर्लक्षित करणार नाही. त्यामुळे मुलांनी सकारात्मक वृत्तीने आपल्या आयुष्याचे नियोजन करावे, असे आवाहनही नितीन गडकरी यांनी केले आहे.

हार न मानता लढण्याचे आवाहन - बालकांनो तुमच्या दु:खाची भरपाई होऊ शकत नाही. मात्र, ज्यांच्या आयुष्यात संघर्ष आला त्यानाच मोठे आणि यशस्वी होता आले हा इतिहास आहे. त्यामुळे हार न मानता लढत राहण्याचे आवाहन केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी केले आहे. सेवा हेच कर्म माणणाऱ्या शासनाची ही भावनिक पूर्तता असल्याचे त्यांनी सांगितले.

काय आहे योजना - कोरोना महामारीमुळे आपले आई-वडील गमावलेल्या मुलांना 'पीएम केअर फॉर चिल्ड्रन फंड' ( PM CARES for Children ) निधीतून दहा लाख रुपयांची आर्थिक मदत केली जात आहे. या मुलांना वयाच्या 23 वर्षापर्यंत मासिक स्टायपेंड देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय आयुष्यमान भारत योजनेतून मुलांना पाच लक्ष रुपयांचा आरोग्य विमा दिला जाणार आहे. त्याचा प्रीमियम देखील पीएम केअर्स फंडातून भरला जाणार आहे. याशिवाय सर्व शैक्षणिक सुविधा उपलब्ध केली जाणार आहे.

79 मुलांनी आई आणि वडील गमावले - एकट्या नागपूर जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या दहा हजारांवर आहे. मृत्यूमुखी पडलेल्यामध्ये जिल्ह्यातील 2700 मुलांचे आई किंवा वडील गेलेल्याचा समावेश आहे. 79 मुलांचे आई आणि वडील दोघेही या महामारीत मृत्यूमुखी पडले आहे. काहींच्या नातेवाईकांनी त्यांना स्वीकारले नाही. अशा मुलांची काळजी शासन घेत आहे. केंद्रासोबत राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांना मिळावा यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या मुलांना आयुष्यात प्रतिष्ठा आणि संधी देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची घोषणा प्रधानमंत्र्यांनी केली होती. त्यानुसार या मुलांच्या शिक्षणाची, आरोग्याची, निवाऱ्याची व्यवस्था शासन करणार आहे. या संदर्भातील सर्व दस्तऐवज व स्नेह प्रमाणपत्र आज मुलांना वितरीत केले गेले.

हेही वाचा -आमचे तीन आणि त्यांचे तीन उमेदवार ठरले तर घोडेबाजार होणारच नाही - देवेंद्र फडणवीस

ABOUT THE AUTHOR

...view details