नागपूर - भाजपच्या एका नेत्याने जामनेर येथील आदिवासी महिलेला मुंबईत स्वतःच्या घरात डांबून ठेवले, नंतर तिला सोडले आणि जेव्हा ती परत गावात गेली तेव्हा तिच्या पतीने आत्महत्या केली. ही जामनेरची घटना आहे, असा गंभीर आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी नाव न घेता केला. सामान्य घरातील मुली पळवून स्वतःच्या घरात ठेवणारा तो नेता कोण? याचाही खुलासा अधिवेशनात होणार, असा इशारा नवाब मलिक यांनी केला आहे. गोंदियाहून ते मुंबईसाठी निघाले होते, दरम्यान नागपूर विमानतळावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
माहिती देताना मंत्री नवाब मलिक हेही वाचा -गंगा-जमुना वस्तीत भुयार-तळघर सापडल्याचा पोलिसांचा दावा खोटा - ज्वाला धोटे
लोकांचे प्रश्नांवरून लक्ष भटकवण्याचे काम करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे, असा प्रश्न विचारला असता, भाजपचे नेते किती घाबरत आहेत, अशी मिश्कील टीका मलिक यांनी केली. तसेच, आदिवासी महिलांचा गैरफायदा घेणाऱ्या नेत्याचे नाव न घेता अधिवेशनात धमाका करणार असल्याचा इशाराही नवाब मलिक यांनी दिला.
समीर वानखेडे यांनी मागसवर्गीय आयोगाच्या उपाध्यक्षांची भेट घेऊन त्यांना कागदपत्र दिले. पण, मागासवर्गीय आयोगाचे उपाध्यक्ष हलदर हे भाजपचे नेते आहेत. त्यांनी समीर वानखेडे यांनी धर्मपरिवर्तन केले नसल्याचे सर्टिफाईड केले. पण, हा त्यांचा अधिकार नाही. कारण प्रत्यक्षात हे सर्टिफिकेट मुंबईचे तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. फोर्ज डॉक्युमेंटच्या आधारावर फसवणूक करून हे डॉक्युमेंट काढण्यात आले आहेत. याबाबतीत मुंबईत काही पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी काही वकिलांनी दाखल केल्या आहेत. सर्टिफिकेट वैध की अवैध? हे ठरवण्यासाठी जात पडताळणी समिती राज्याने विभागवार तयार केली आहे. तक्रार झाल्यास दाखल्याचा तपास करण्याची जबाबदारी समितीची आहे. सामाजिक न्याय विभागाकडे लोक तक्रार करणार आहेत, त्याचबरोबर कोंकण विभागाच्या जात पडताळणी समितीकडे तक्रार केली जाईल आणि बोगस कागदावर दाखला काढण्यात आला आहे, हे सिद्ध होणार आहे. हलदर यांना राजकीय पद मिळाले आहे. पदाची गरिमा त्यांनी मलीन करू नये, असे नवाब मलिक म्हणाले.
बोगस सर्टिफिकेट हा विषय गंभीर आहे. माझ्याकडे असलेले पुरावे न्याय विभागाला देईल. अनेकजणसुद्धा त्या बोगस सर्टिफिकेटबाबत तक्रारी देणार आहेत. तो त्यांचा अधिकार असल्याचेही नवाब मलिक म्हणाले.
हेही वाचा -पोपटाचा धंदा माझा नाही.. नवाब मलिक पोपट होऊ शकत नाही - अल्पसंख्यांक मंत्री