महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'कर्जमाफीचे श्रेय एका पक्षाचे नसून ते महाविकास आघाडीचे'

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा प्रस्ताव हा राज्य सरकारचा आहे. कर्जातील दोन लाख रुपये माफ करण्याचा निर्णय तीनही पक्षाने संयुक्तपणे घेतला आहे. त्यामुळे श्रेय घेण्याचा प्रश्न येत नसल्याचे मंत्री डॉ. नितीत राऊत यांनी सांगितले.

minister dr nitin raut
मंत्री डॉ. नितीन राऊत

By

Published : Dec 26, 2019, 11:29 AM IST

नागपूर - शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा प्रस्ताव हा राज्य सरकारचा आहे. कर्जातील दोन लाख रुपये माफ करण्याचा निर्णय तीनही पक्षाने संयुक्तपणे घेतला आहे. त्यामुळे श्रेय घेण्याचा प्रश्न येत नसल्याचे मंत्री डॉ नितीत राऊत यांनी सांगितले आहे. अमृता फडणवीस यांच्या ट्विटर वॉरवरही त्यांनी भाष्य केले आहे.

मंत्री डॉ. नितीन राऊत

हेही वाचा -उमरेड-नागपूर महामार्गावर कारने घेतला पेट, जीवितहानी नाही

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात पोलिसांचे पगारी खाते अॅक्सिस बँकेकडे वळवण्यात आले होते. ही खाती पुन्हा अन्यत्र वळवण्याचा निर्णय घेतला जात असल्याची चर्चा आहे. यावर नितीन राऊत म्हणले की, हा विषय सर्वस्वी गृह खात्याचा आहे, गृह खात्याला वाटले तर ते याबाबत निर्णय घेऊ शकतात.

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सध्या ट्विटरवर चांगल्याच सक्रिय झाल्या आहेत. त्यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. यावर बोलताना नितीन राऊत म्हणाले, की राजकारण हे काही सांस्कृतिक केंद्र नाही, राजकारणात सक्रिय एखाद्या व्यक्तीने प्रश्न विचारला तर त्याला उत्तर देणे संयुक्तिक ठरतं, अमृता आमच्या घरची पोरगी आहे, जर तिच्या (अमृताच्या ) नवऱ्याने विचारले असते तर आम्ही उत्तर दिले असते.

हेही वाचा -जेवणाची गुणवत्ता निकृष्ट असल्याने विध्यार्थ्यांचे अन्नत्याग आंदोलन

मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त सापडत नाही. दरवेळी नवीन तारीख पुढे येत असताना आता हा विस्तार 30 तारखेच्या आसपास होण्याची शक्यता असल्याचे मंत्री नितीन राऊत यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details