नागपूर -पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे विदर्भ दौऱ्यावर ( Aaditya Thackeray On Vidarbha Tour ) आहेत. यावेळी त्यांनी नांदगावमधील औष्णिक वीज प्रकल्पाच्या फ्लाय एश डम्पिंगची पाहणी केली. यावेळी त्यांनी फ्लाय एश डंम्पिग पाइपलाइन तात्काळ हटवण्याबाबत सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या ( Aaditya Thackeray On Fly Ash Dump ) आहेत. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
आदित्य ठाकरे म्हणाले की, नांदगावमधील फ्लाय एश डम्पिंगच्या प्रदूषणाबाबत नागरिकांच्या तक्रारी केल्या ( Aaditya Thackeray On Nandgaon ) होत्या. याचे व्हिडीओ देखील मी पाहिले होते. मात्र, मला स्वत: तेथील पाहणी करायची होती. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर फ्लाय एश डम्पिंगची पाइपलाइन हटवावी. तसेच, जिथे राख टाकण्यात येत होती ती जागा साफ करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वीज आवश्यक आहे, पण पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी घेऊ, असेही आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.