नागपूर :भारत आणि ऑस्ट्रेलिया ( India vs Australia Cricket Match ) दरम्यान जामठा येथे होऊ घातलेला सामना बघण्या करीता आलेल्या क्रिकेट प्रेमींकरता महामेट्रोने विशेष सोय केली आहे. विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या ( Vidarbha Cricket Association ) विनंतीनुसार, महा मेट्रोने न्यू एअरपोर्ट स्टेशन येथून मेट्रो गाड्या चालवण्याची व्यवस्था केली आहे. सामना संपल्यावर एक वाजे पर्यंत मेट्रो तर्फे गाड्या चालणार असून प्रेक्षकांना या माध्यमाने आपल्या गंतव्यावर पोहोचणे सुकर होणार आहे.
मेट्रो सेवा उपलब्ध : ऑरेंज आणि एक्वा लाईन वरील नियमित प्रवासी मेट्रो सेवा रात्री १० वाजेपर्यंत उपलब्ध असेल. सामना संपल्यानंतर रात्री १ वाजे पर्यंत, न्यू एयरपोर्ट मेट्रो स्टेशन येथून इतर सर्व कार्यरत मेट्रो स्टेशन येथे परत येण्याकरता मेट्रो सेवा उपलब्ध असेल. ऑरेंज मार्गावर प्रवास करणारे क्रिकेट प्रेमी सीताबर्डी इंटरचेंज येथून एक्वा मार्गिकेवर प्रवास करण्याकरता गाडी बदलू शकतात.