नागपूर - मेफेड्रोन म्हणजेच एमडी ड्रग्सची तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन आरोपींना नागपूर शहरातील पाचपावली पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून 10 ग्रॅम एमडी ड्रग्स,एक पिस्तूल, पाच जिवंत काडतुस आणि काही घातक शस्त्रे जप्त केली आहे. मुन्ना अब्दुल अजीज आणि शेख नईम शेख साबीर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पिस्तुलसह घातक शस्त्र जप्त काही दिवसांपासून त्यांच्यावर पाळत ठेवून होते
पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी अब्दुल हा नवा नकाशा येथील अजहर अली यांच्या घरी भाड्याने राहत होता. मात्र तो मेफेड्रोन ड्रग्सच्या तस्करीत सक्रिय असल्याने मित्र शेख नईमच्या घरीच राहायला गेला होता. या संदर्भात माहिती पाचपावलीच्या पोलिसांना मिळाली होती,त्यावरून पोलीस गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पाळत ठेवून होते. पोलिसांनी सापळा रचून शेख रहीमला नवा नकाशा भागातील किदवई शाळे जवळील भागातून ताब्यात घेतले.
पिस्तुलसह घातक शस्त्र जप्त ड्रग्स आणि पिस्तुल जप्त पोलिसांनी अब्दुलची अंगझडती घेतली असता त्याच्या जवळ तीस हजार रुपये किमतीचे दहा ग्रॅम मेफेड्रोन ड्रग्स पावडर आढळून आले. याशिवाय एक पिस्तूल, काही घातक शस्त्र, पाच जिवंत काडतुसे दोन मोबाईल सापडले. पोलिसांनी शेख नईमच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरात देखील शस्त्र सापडून आले आहे. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन दोन लाख तीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हेही वाचा -Russia-Ukraine Crisis : युक्रेन-रशिया वादाची झळ भारताला; सेन्सेक्स गडगडला तर इंधनाचा भडका