नागपूर - नागपूर महानगर पालिकेच महापौर संदीप जोशी यांनी यापुढे महापालिका निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले. चार वेळा नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष आणि महापौरपद भूषावल्यानंतर कार्यकर्त्यांना देखील संधी मिळावी या करिता या निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
'नेत्यांनी निवडणूक लढवायची आणि कार्यकर्त्यांनी सतरंज्या उचलायच्या, हे बरोबर नाही. आज वाढदिवस असल्याने मी ही घोषणा करतोय. पक्षासाठी मेहनत करणारा कार्यकर्ता माझ्या जागी लढेल.' अशी घोषणा संदीप जोशी यांनी यावेळी केली.