नागपूर:- नागपूर महानगरपालिकेत स्मार्ट सिटीवरून सुरू झालेले रणकंदन अजूनही सुरूच आहे. पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बेकायदेशीरपणे आणि असंवैधानिकपणे स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे हाती घेतल्याचा आरोप करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खेला आहे. त्यांनी तुकाराम मुंढे यांची तक्रार पंतप्रधान कार्यालयाचे राज्य मंत्री जितेंद्र सिंह आणि केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांचेकडे केल्यानंतर आज महापौर संदीप जोशी यांनी स्मार्ट सिटीचा दौरा केला आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाची कामे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जाणीवपूर्वक थांबवून हा प्रकल्प गुंडाळण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप महापौरांनी केला आहे.
नागपूर स्मार्ट सिटीच्या कामांची महापौरांनी केली पाहणी, आयुक्त तुकाराम मुंढेंवर केले आरोप - स्मार्ट सिटीच्या कामांची महापौरांनी केली पाहणी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तुकाराम मुंढे यांची तक्रार पंतप्रधान कार्यालयाचे राज्य मंत्री जितेंद्र सिंह आणि केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांचेकडे केल्यानंतर आज महापौर संदीप जोशी यांनी स्मार्ट सिटीचा दौरा केला आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाची कामे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जाणीवपूर्वक थांबवून हा प्रकल्प गुंडाळण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप महापौरांनी केला आहे.
पूर्व नागपूरातील पारडी, भरतवाडा या भागातील कामांचा आढावा महापौर संदिप जोशी यांनी घेतला. यावेळी भाजपचे स्थानिक आमदार कृष्णा खोपडे उपस्थित होते. या प्रकल्पाची कामे किती टक्के पूर्ण झाली, त्यात उशीर कशामुळे होत आहे? या बाबत संबंधीत अधिकाऱ्यांची कानउघाडणी महापौरांनी केली आहे. या प्रकल्पा अंतर्गत ज्या नागरिकांना स्थलांतरीत केले गेले त्याचे पुर्नवसनही न झाल्याने या नागरिकांचे काय ? असा सवालही यावेळी उपस्थिती करण्यात आला.
याच बरोबरच नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्प हा सहा महिण्यापूर्वी देशातील क्रमांक एक वर होता मात्र आता तो २८ वर गेलं आहे. या प्रकल्पातील कर्मचारी कमी केल्या गेल्याचा आरोपही महापौरांनी या वेळी केला. केंद्र सरकारच्या माध्यमातून स्मार्ट सिटी प्रकल्प नागपूरात राबविण्यात येत आहे. गेल्या सहा महिण्यापासून या प्रकल्पाची सर्व कामे थांबली असल्याचा आरोप महापौर संदिप जोशी यांनी केला आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून या प्रकल्पात वारंवार हस्तक्षेप करून संबंधीत कंत्राटदारांचे काम बंद पाडले आहे, त्यामुळे सामान्य नागरीकांचे हाल सुरू असलेल्याचे संदिप जोशी म्हणाले आहेत. स्मार्ट सिटी प्रकल्प गुंडाळण्याचा तुकाराम मुंढे यांचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले आहेत.