महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maskara Ganpati 2022 : राज्यात गणेशोत्सवाची सांगता, विदर्भातील 'हा' गणेश दिमाखात होणार विराजमान - समशेर बहाद्दर श्रीमंत राजे खंडोजी महाराज भोसले

दहा दिवस लाडक्या बाप्पांची मनोभावे सेवा केल्यानंतर काल अनंत चतुर्थीला (Anant chaturdashi ) लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. संपूर्ण राज्यात गणेशोत्सवाची सांगता झाली असली तरी मात्र, नागपूरसह विदर्भात २३ सप्टेंबरपर्यत गणेश विराजमान असणार आहेत. पितृपक्षात मस्कऱ्या गणपतीची प्रतिष्ठापना (Installation of Maskara Ganesha in Pitrupaksha)करण्यात येते. या उत्सवाला २६७ वर्षे झाली असून भोसला पॅलेसमध्ये (Bhosale palace) हा उत्सव साजरा केला जायचा, मात्र आता सार्वजनिक मंडळामध्ये मस्कऱ्या गणपतीचीस्थापन केली जाते. विदर्भात मस्कऱ्या गणपतीची परंपरा २३५ वर्षे जुनी आहे. मस्कऱ्या गणपतीची स्थापना समशेर बहाद्दर श्रीमंत राजे खंडोजी महाराज भोसले (Samsher brave rich king Khandoji Maharaj Bhosale)ऊर्फ चिमणाबापू यांनी वर्ष १७८७ मध्ये केल्याचे ऐतिहासिक दाखले आढळतात.

Maskara Ganpati
मसकऱ्या गणपती

By

Published : Sep 10, 2022, 3:56 PM IST

नागपूर: दहा दिवस लाडक्या बाप्पांची मनोभावे सेवा केल्यानंतर काल अनंत चतुर्थीला (Anant Chaturdashi) लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. संपूर्ण राज्यात गणेशोत्सवाची सांगता झाली असली तरी मात्र, नागपूरसह विदर्भात २३ सप्टेंबरपर्यत गणेश विराजमान (Ganesha seated in Vidarbha till 23rd September) असणार आहेत. पितृपक्षात मस्कऱ्या गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात येते. या उत्सवाला २६७ वर्षे झाली असून भोसले पॅलेसमध्ये हा उत्सव साजरा केला जायचा,मात्र आता सार्वजनिक मंडळामध्ये मस्कऱ्या गणपतीची स्थापन केली जाते. विदर्भात मस्कऱ्या गणपतीची परंपरा २३५ वर्षे जुनी आहे. मस्कऱ्या गणपतीची स्थापना समशेर बहाद्दर श्रीमंत राजे खंडोजी महाराज भोसले ऊर्फ चिमणाबापू यांनी बंगालवर विजय मिळवल्याचा आनंद उत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने पितृपक्षात मस्कऱ्या गणपती प्रतिष्ठापना वर्ष १७८७ मध्ये केल्याचे ऐतिहासिक दाखले आढळतात.

मसकऱ्या गणेशोत्सवाचा इतिहास :इ.स.१७८७ मध्ये श्रीमंत राजे खंडोजी महाराज भोसले (उर्फ चिमणाबापू) यांनी मस्कऱ्या (हडपक्या) या उत्सवाचे आयोजन केले होते, या मागील थोडक्यांत इतिहास असा की शुर लढव्यया सरकार समशेर बहाद्दर श्रीमंत राजे खंडोजी महाराज भोसले (उर्फ चिमणाबापू) हे अन्यायाच्या विरोधात लढत असतांना ते बंगालच्या स्वारीवर होते. बंगाल वर विजय मिळवून परत येत असतांना कुळाचारी गणपतीचे विसर्जण झाले होते. बंगालवर विजय मिळविण्याचा आनंद साजरा करण्याकरीता ह्या मसकऱ्या (हडपक्या) गणपतीची स्थापना करून त्यात विविध नकला, लावण्या, खडी गम्मत या सारख्या कार्यक्रमाचे आयोजन करुण हा आनंदोत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्यात आला.

२३५ वर्षांची ऐतिहासिक परंपरा :श्रीमंत राजे खंडोजी महाराजांनी पितृपक्षात मस्काऱ्या (हडपक्या) गणपतीची चालु केलेली ही परंपरा आजपर्यंत कायम आहे. श्रीमंत राजे मुधोजी महाराज भोसले हे महाराजा ऑफ नागपूर ट्रस्टच्या व्यवस्थापनात हा उत्सव मोठया प्रमाणात साजरा करतात. या उत्सवास यावर्षी या उत्सवाला २३५ वर्ष पूर्ण होत आहे.

मसकऱ्या गणपतीचे वैशिष्ट्य :श्रीमंत राजे खंडोजी महाराजाच्या काळात या गणपतीची १२ हाताची, २१ फुटाची मुर्ती स्थापन केली जात होती. त्या अनुषंगाने तसीच मुर्ती १२ हाताची ५ फुटाची गणेशाची मूर्ती स्थापीत केली जाणार आहे. हया गणपतीचे विशेष महत्व म्हणजे हा नवसाला पावणारा गणपती आहे आणि आजही बऱ्याच भक्तांना प्रचिती होत आहे.


ABOUT THE AUTHOR

...view details