महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नागपुरात मारबत उत्सव उत्साहात; विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या बडग्यांनी वेधले लक्ष - काळी आणि पिवळी मारबत

शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या मारबत उत्सवात काळी आणि पिवळी मारबत (पुतळे ) मिरवणुकीच्या स्वरूपात काढण्यात आली. मारबतीच्या या मिरवणुकीत वर्तमान काळातील अनिष्ट चालीरिती आणि समस्यांवर टीकात्मक भाष्य करणारे पुतळे सर्वांच्या केंद्रस्थानी होते.

मारबत

By

Published : Aug 31, 2019, 6:35 PM IST

नागपूर - शहरात आज शनिवारी पौराणिक, ऐतिहासिक आणि सामाजिक महत्व असलेला मारबत उत्सव उत्साहाने साजरा झाला. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या उत्सवात काळी आणि पिवळी मारबत (पुतळे ) मिरवणुकीच्या स्वरूपात काढण्यात आली. शहरातील वेगवेगळ्या मार्गातून ही मिरवणूक काढण्यात आली. मारबतीच्या या मिरवणुकीत वर्तमान काळातील अनिष्ट चालीरिती आणि समस्यांवर टीकात्मक भाष्य करणारे पुतळे सर्वांच्या केंद्रस्थानी होते.

नागपुरात मारबत उत्सव उत्साहात


जागनाथ इतवारी परिसरातून निघालेली पिवळी मारबत मिरवणूक आणि याच परिसरातील नेहरू चौकातून निघालेली काळी मारबत यांची भेट झाल्यानंतर मिरवणूकीला सुरुवात झाली. दरम्यान, मिरवणूक पाहण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी झाली होती. मारबतीचे दर्शन केल्याने सर्व इडा पीडा, रोगराई, दुःख नाहीसे होतात, अशी लोकांची भावना असल्याने हजारो लोक दर्शनासाठी रस्त्यांवर आले होते.

नागपुरात निघालेली मारबत

या उत्सवा दरम्यान, विविध विषयांवर भाष्य करणारे बडगे मिरवणुकीत सहभागी झाले होते. यामध्ये इव्हिएमद्वारे घेतली जाणारी निवडणूक बंद करा आणि जुन्या पद्धतीने 'बेलेट पेपर'द्वारे निवडणूक घ्या. अशी मागणी करणाऱ्या बडग्याने मिरवणुकीत सर्वांचे लक्ष वेधले होते. यासह माजी अर्थ मंत्री म्हणून देशाला लुटण्याचा आरोप करणारा पी चिदंबरमचा बडगा ही मिरवणुकीत दिसून आला. मारबत मिरवणूकीमध्ये एकेक करुन विविध समस्या आणि वाईट प्रवृत्तीवर बनवलेले बडगे सहभागी व्हायला सुरुवात झाली आहे. विजय माल्यावर आधारित बडगा देखील लक्षवेधी ठरला तर 'काश्मीर हमारा है, पिओके भी हमारा है' म्हणणारा बडगा आणि मोहम्मद हाफिज आणि काश्मीरमधील दहशतवादावरील बडगा विशेष होता. पुरुषांना स्त्रीविषयक कायद्यांच्या अतिरेकाने वाचवा, पुरुषांना खोट्या प्रकरणात अडकवू नका, असे सांगणारा बडगा सर्व पुरुष मंडळींच्या मनातील भावना सांगून गेला, अशी चर्चा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details