नागपूर- गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो. उपराजधानीत खामला भागातदेखील सामूहिकरित्या गुढीपाडवा साजरा करण्यात आला. यावेळी हिंदू नववर्षाचे स्वागत ढोल-ताशांच्या गजरात आणि शोभा यात्रेच्या जल्लोषात करण्यात आले.
उपराजधानीत ढोल ताश्यांचा गजरात गुढीपाडव्याची शोभायात्रा - Nagpur Gudhipadva
येणाऱ्या भावी पिढीला याचे महत्त्व आणि भारतीय संस्कृती समजावी म्हणून सामूहिकरित्या एकच गुढी खामला भागातली लोक उभारतात. गेल्या अनेक वर्षांपासून अशा रीतीने गुढीपाडवा साजरा करण्यात येतो.
मराठी कालगणनेतील चैत्र हा पहिला महिना आहे. येणाऱ्या भावी पिढीला याचे महत्त्व आणि भारतीय संस्कृती समजावी म्हणून सामूहिकरित्या एकच गुढी खामला भागातली लोक उभारतात. गेल्या अनेक वर्षांपासून अशा रीतीने गुढीपाडवा साजरा करण्यात येतो.
१ जानेवारीला नवीन वर्षाचे स्वागत करण्यात येते. त्याचप्रमाणे भारतीय संस्कृती जोपासत तरुणांनी गुढीपाडवा साजरा करावा, अस संदेश शोभायात्रेतील नागरिकांनी दिला. ग्रीष्म ऋतूची सुरवात चैत्र माहिन्यात होते. त्यामुळे गुढीपाडवा सणाला वैज्ञानिक कारणदेखील असल्याचे शोभायात्रेतील सहभागींनी सांगितले. शोभायात्रेत अनेक महिला पारंपारिक फेटे घालून उत्साहात सहभागी झाल्याचे दिसून आले.