नागपूर -विदर्भ साहित्य संघाचे वर्तमान अध्यक्ष ( Present President of Vidarbha Sahitya Sangh ) मनोहर म्हैसाळकर यांचे शुक्रवारी सायंकाळी उपचारा दरम्यान निधन ( Manohar Mhaisalkar passed away ) झाले. ते ९० वर्षांचे होते.प्रकृती खालावल्याने दोनच दिवसांपूर्वी हाॅस्पीटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र, आज त्यांची प्राणज्योत मालावल्याची बातमी पुढे येताच साहित्य आणि राजकीय क्षेत्रातुन श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली -विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष श्री मनोहरराव म्हैसाळकर यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. त्यांच्या निधनाने केवळ एक उत्तम साहित्यिकच नाही, तर एक चांगला संघटक, व्यवस्थापक, खेळाडू आपल्यातून हिरावला गेला आहे अशी भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत. अनेक दिग्गज साहित्यिक आणि लेखकांना एका सूत्रात बांधण्याचे काम मनोहररावांनी केले. मनोहररावांचे आशीर्वाद असले की, साहित्यातील कुठलेही आयोजन यशस्वीच होते, अशी त्यांची ख्याती. आताही वर्ध्यातील आगामी 96 व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनात त्यांनी स्वत:ला झोकून दिले होते. केवळ विदर्भ साहित्य संघच नव्हे,तर अनेक संस्थांशी त्यांचा अतिशय जवळून संबंध आला. अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला. संपर्कात आलेल्या अनेक संस्था त्यांनी वि.सा.संघाशी जोडल्या. या जाणकार साहित्यिकाचे निधन ही साहित्यजगताची मोठी हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.