महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

वाढीव वीज बिलाचा धसका; नागपुरात एकाने स्वतःला जाळून घेत केली आत्महत्या - नागपूर सुसाईड न्यूज

40 हजारांचे वीज बिल आल्यानंतर ते कमी करून मिळण्याऐवजी वीज विभागाकडून पुरवठा खंडित करण्याची धमकी मिळाली होती. त्यामुळे मानसिक त्रासाला कंटाळून लीलाधर गायधने या 56 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याचा आरोप मृताच्या कुटुंबियांनी केला आहे.

nagpur
लीलाधर गायधने

By

Published : Aug 10, 2020, 10:19 PM IST

Updated : Aug 10, 2020, 10:39 PM IST

नागपूर - लॉकडाऊन काळात राज्यात सर्वत्र वाढीव वीज बिल आल्यामुळे नागरिकांना त्याचा फटका बसला आहे. असे असताना मात्र नागपूरमध्ये वीज बिल जास्त आल्याने स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. यशोधरा नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

वाढीव वीज बिलाच्या धसक्याने नागपुरात एकाने स्वतःला जाळून घेत केली आत्महत्या

दरम्यान, 40 हजारांचे वीज बिल आल्यानंतर ते कमी करून मिळण्याऐवजी वीज विभागाकडून पुरवठा खंडित करण्याची धमकी मिळाली होती. त्यामुळे मानसिक त्रासाला कंटाळून लीलाधर गायधने या 56 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याचा आरोप मृताच्या कुटुंबियांनी केला आहे.

हेही वाचा -मराठा आरक्षण आंदोलने भाजप पुरस्कृत, अशोक चव्हाणांचा आरोप

गायधने हे खासगी व्यवसाय करायचे, मात्र लॉकडाऊनमध्ये त्यांचा व्यवसाय देखील बंद झाला, अशातच गायधने यांच्या राहत्या घराचे वीज बिल 40 हजार रुपये आले होते. लॉकडाऊनमुळे घरी खाण्याचे वांदे असताना इतकं बिल भरणार कुठून? या चिंतेत लीलाधर गायधने असताना मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचे त्यांच्या परिवारातील सदस्यांनी सांगितले. आत्महत्या करण्यावेळी लीलाधर यांनी मद्याचे सेवन केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

महावितरणचे स्पष्टीकरण -

मृताच्या कुटुंबातील लोकांनी महावितरणवर गंभीर आरोप केले आहेत, मात्र महावितरणने सर्व आरोप फेटाळले आहेत. गायधने यांची गेल्या अनेक महिन्यांपासूनची थकबाकी होती. शिवाय कोणतीही तक्रारीचा अर्ज त्यांनी दिला नसल्याचे महावितरणचे जनसंपर्क अधिकारी अजित इगतपुरीकर यांनी सांगितले आहे.

अजित इगतपुरीकर -जनसंपर्क अधिकारी, महावितरण

महावितरणनं गायधने यांची लॉकडाऊनपूर्वी अनेक महिन्यांपासूनची थकबाकी असल्याने त्यांना एवढ्या मोठ्या रक्कमेचे वीज बिल आल्याचे सांगण्यात आले. गायधने यांची वीज बिल प्रकरणी कोणतीच तक्रार वा अर्ज विभागाकडे आला नसल्याचेही महावितरणने सांगितले आहे. दरम्यान, याप्रकरणी पूर्ण तपास होईल, अशी ग्वाही देण्यात आली आहे.

Last Updated : Aug 10, 2020, 10:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details