नागपूर -मातृभाषेचा आदर प्रत्येकाने केला पाहिजे. देशात विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेत असावे. अगोदर मातृभाषेला महत्व द्या. मात्र, त्यासोबतच इतर भाषासुद्धा वापरा असे मत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले. यासोबतच देशात बस, ट्रेन जाळण्यापेक्षा आपल्या कल्पना, विचार प्रज्वलित करा. देशात शांती ठेवा, असेही त्यांनी सांगितले. नागपुरात कवी कालिदास संस्कृत विश्व विद्यापीठाच्या तीन दिवसीय अधिवेशन कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी उपराष्ट्रपती बोलत होते.
हेही वाचा... Jamia CAA protest: आधी घोषणांनी रस्ते रंगवले, आता विद्यापीठातच 'डिटेन्शन सेंटर' बनवलं
आपल्या देशातील 200 भाषा लुप्त होत चालल्या आहेत. हा चिंतेचा विषय आहे. आपल्या स्थानीय भाषेचा वापर करावा, अशी विनंती त्यांनी यावेळी केली. भारताचा इतिहास सगळ्या विद्यार्थ्यांना शिकविला पाहिजे. प्रत्येक प्रांतातील इतिहास मुलापर्यंत पोहोचला पाहिजे. विद्यार्थ्यांना सगळ्याच प्रकारचे शिक्षण मिळाले पाहिजे. त्याचप्रमाणे संस्कृती, इतिहास, भाषा यांचे ज्ञान दिले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.