नागपूर - म्युकरमायकोसिस आजारावरील औषध महागडे असल्याने गरीब रुग्णांना ती परवडणारी नाहीत, म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुक्यर-मायकोसिसवर आवश्यक उपचारावरील औषध अल्प दरात रुग्णांना उपलब्ध करून देण्यासंदर्भात राज्य सरकारने विचार करावा, त्याकरिता एसओपी तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.
सध्या नागपूर आणि विदर्भात मूक्यर-मायकोसिस या आजाराने ग्रासलेल्या रुग्णांचा आकडा हजारच्या पुढे गेला आहे. त्यामुळे न्यायालयाने सरकारला दिलेल्या निर्देशांमुळे रुग्णांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपूर आणि विदर्भासह संपूर्ण राज्यात मुक्यरमायकोसिस म्हणजेच ब्लॅक फंगस या आजाराने थैमान घालायला घातले आहे. कोरोनाच्या जीवघेण्या आजारावर मात केल्यानंतर अनेक व्याधी असलेल्या रुग्णांना मुक्यरमायकोसिस होण्याचा धोका सर्वाधिक आहे.