नागपूर - लक्ष्मी पूजनच्या निमित्याने नागपूरकरांनी दणक्यात फटाक्यांची आतिषबाजी केली. सर्वत्र आनंदात दिवाळी साजरी होत असताना नागपूर शहराच्या विविध भागात दहा ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या असल्याची नोंद झाली आहे. यापैकी 9 घटना अतिशय किरकोळ स्वरूपाच्या आहेत. तर एका मोठी घटना घडली आहे. ज्यामध्ये रात्रीच्या सुमारास एका फटाक्याच्या दुकानाला आग लागली. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणत्याही घटनेत कुणालाही ईजा झालेली नाही.
नागपुरात फटाक्याच्या दुकानाला लागली आग; लाखोंचे नुकसान - Nagpur
सर्वत्र आनंदात दिवाळी साजरी होत असताना नागपूर शहराच्या विविध भागात दहा ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या असल्याची नोंद झाली आहे. यापैकी 9 घटना अतिशय किरकोळ स्वरूपाच्या आहेत.

जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाराखोली परिसरातील ए-1 सेल्स सेंटरच्या इमारतीतील फटाक्याच्या दुकानाला रात्री बाराच्या सुमारास आग लागली. सुदैवाने ज्यावेळी आग लागली तेव्हा दुकान बंद झाले होते. इमारतीच्या इतर भागात किराणा दुकानासह इतर दुकाने आहेत. आग लागल्याची सूचना मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. दुकानाची भिंत तोडून अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना इमारतीच्या आत प्रवेश केला आणि सुमारे दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश मिळाले.
सुदैवाने जीवित हानी टकली -
फटाक्याच्या दुकानात रात्री उशिरा आग लागण्याची घटना घडली. त्यावेळी दुकानात कुणीही उपस्थित नसल्याने सुदैवाने जीवित हानी झाली नाही. इतर 9 घटनांमध्ये सुद्धा कुणालाही ईजा झाली नाही.