महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गावनिहाय आकडेवारी देण्याचे महाविकास आघाडीचे भाजपाला आव्हान

भाजपातर्फे करण्यात आलेला दावा पूर्णतः खोटा असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. महाविकास आघाडीचे ८०पेक्षा जास्त जागी सरपंच निवडून आल्याचा दावा महाविकास आघाडीने केला आहे.

BJP
BJP

By

Published : Feb 11, 2021, 7:35 PM IST

Updated : Feb 11, 2021, 7:47 PM IST

नागपूर - सरपंचपदाच्या निवडणुकीत नागपूर जिल्ह्यातील १२९ पैकी भारतीय जनता पार्टीला तब्बल ७३ जागी विजय मिळाल्याचा दावा भाजपातर्फे करण्यात आला आहे. तर भाजपातर्फे करण्यात आलेला दावा पूर्णतः खोटा असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. महाविकास आघाडीचे ८०पेक्षा जास्त जागी सरपंच निवडून आल्याचा दावा महाविकास आघाडीने केला आहे.

गावनिहाय आकडेवारी देण्याचे आव्हान

निवडणूक झालेल्या १२९ ग्रामपंचायतींपैकी ७३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदावर भाजपा विजयी झाल्याचा दावा राज्याचे भाजपा सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. निवडणुकीदरम्यान भाजपाचे उमेदवार पळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही बावनकुळे यांनी केला. सोबतच जिल्ह्यात गेल्या १३ महिन्यांपासून एकही नवे विकासकार्य न केल्याने जनतेने महाविकास आघाडी सरकारला निवडणुकीच्या माध्यमातून नाकारल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपा सरकारच्या काळात झालेल्या कामांचे उद्घाटन हे सरकार करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. तर सरपंचपदी भाजपा उमेदवारांच्या विजयावर काँग्रेस व राष्ट्रवादीने प्रश्न उपस्थित करीत प्रत्येक गावनिहाय आकडेवारी देण्याचे आव्हान केले आहे. भाजपतर्फे चुकीची माहिती पसरवली जात असल्याचाही आरोप महाविकास आघाडीने केला आहे.

आरक्षणानुसार एकही सदस्य नसल्याने पेच

जानेवारी महिन्यात निवडणूक झालेल्या जिल्ह्यातील १२९ ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि उपसरपंच पदासाठी आज निवडणूक पार पडली. यामुळे गावागावात राजकीय मोर्चेबांधणीला वेग आला होता. ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यावर १३ही तालुक्यात आरक्षण सोडत काढण्यात आली. यात पाच गावात नव्या आरक्षणानुसार निवडून आलेला एकही सदस्य नसल्याने सरपंचपदाचा पेच निर्माण झाला आहे. यात रामटेक तालुक्यातील दाहोडा, सावनेर तालुक्यातील नांदोर, जैतपूर आणि सोनपूर तर कळमेश्वर तालुक्यातील सावंगी तोमर या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीने १०२ तर भाजपाने ७३ ग्रामपंचायतींवर दावा केला होता. नव्या आरक्षण सोडतीनुसार ज्या गावात सरपंचपदासाठी उमेदवार नसेल तिथे उपसरपंचाकडे सरपंचपदाचा प्रभार सोपवण्यात येणार आहे.

Last Updated : Feb 11, 2021, 7:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details