नागपूर -जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच मृत्यू दरातही वाढ झाली आहे. रविवारी कोरोनामुळे 58 जणांचा मृत्यू झाला. तर गेल्या दोन दिवसात एकूण 112 जण दगावले आहेत. तर 3 हजार 970 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात 37 हजार 776 कोरोना रुग्ण सक्रिय आहेत.
दररोज मिळणाऱ्या नवीन कोरोना बधितांमुळे रुग्ण संख्या वाढू लागली आहे. उपचारासाठी बेड कमी पडत असल्याची ओरड होत आहे. यामुळे गृहमंत्री यांनी विभागीय कार्यालयात बैठक घेऊन दररोज किमान 30 बेड वाढवण्याचे म्हटलं आहे. रविवारी आलेल्या अहवालात 16 हजार 155 जणांची चाचणी करण्यात आली आहे.