महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Dilip Walase Patil : राज्यात 7 हजार पोलिसांची भरती प्रक्रिया सुरु होणार; गृहमंत्र्यांची माहिती

नागपूर पोलीस दलाकरीता सर्व सोई सुविधांनी सुसज्ज अशा भव्य पोलीस भवनाचे उद्घाटन आज पार ( Nagpur Police Bhavan Inauguration ) पडले. यावेळी 7 हजार पोलीस शिपाई भर्ती करण्याची प्रक्रिया सुरू झाली ( Seven Thousand Posts Police ) आहे, अशी माहिती गृहमंत्री वळसे पाटीलांनी ( Dilip Walase Patil ) दिली आहे.

Dilip Walase Patil
Dilip Walase Patil

By

Published : Apr 29, 2022, 7:52 PM IST

नागपूर - नागपूर पोलीस दलाकरीता सर्व सोई सुविधांनी सुसज्ज अशा भव्य पोलीस भवनाचे ( Nagpur Police Bhavan Inauguration ) उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( DCM Ajit Pawar ) आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Dilip Walase Patil ) यांच्या हस्ते आज करण्यात आले आहे. यावेळी नागपूरचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत, क्रीडा मंत्री सुनील केदार आणि पोलीस महासंचालक रजनीश सेठ, व्यवस्थापकीय संचालक विवेक फळसणकर उपस्थित होते. महत्वाचे म्हणजे या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव उपस्थितांमध्ये नसल्याने भाजपच्या नेत्यांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.

नागपूरच्या वैभवात भर घालणारी वास्तू - यावेळी बोलाताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, देशात आणि राज्यात कोरोनाचे संकट आल्यामुळे इमारत तयार होण्यास थोडा उशीर झाला होता. मात्र, आज इमारतीची भव्यता बघून मन प्रसन्न झाले. पोलीस भवन नागपूरच्या विभागात भर घालणारी देखणी वास्तू असल्याचेही पवार यांनी म्हटले आहे.

उपमुख्यमंत्र्यांनी टोचले अधिकाऱ्यांचे कान - पोलीस दलातील काही अधिकारी अजूनही समजून घेण्यासाठी तयार नाहीत. कधी आपण ज्युनिअर होतो, आता सिनिअर झाले आहोत. याचे भान ठेवून काम करण्याची गरज असल्याचा सल्ला त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. नागपूर सुधार प्राण्यास (एनआयटी) मार्फत लकडगंज येथे पोलिसांच्या वसाहतीचे काम सुरू आहे. मात्र, ते काम रेंगाळले आहे. मला दिरंगाई चालणार नसल्याचा इशारा अजित पवारांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.

पोलीस दल सक्षम -गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, कायदा सुव्यवस्थेबाबत काही दिवसांत राज्यात नवीन प्रश्न उभे राहू पाहत आहेत. एखादा विषयाला राजकीय मुद्दा करायचा आणि संघर्ष करायचा, अशी कृती सुरू आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली म्हणून सरकारवर आणि पोलीस विभागाला दोषी धरायचे. राज्याचे पोलीस दल असे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सक्षम आहे. गेल्या काळात अमरावती, मालेगावात काही घटना घडल्या आहेत.

दिलीप वळसे पाटील संबोधित करताना

अंमली पदार्थ हद्दपार झाले पाहिजे -नागपूर शहरातील वाढणारी गुन्हेगारी चिंतेचा विषय होता. पण, आता गुन्हेगारी आणि गुन्हेगारांवर आळा घालण्यात पोलिसांना यश आले आहे. शहरातील गुन्हेगार ग्रामीण भागात स्थलांतरित होत असल्याने ग्रामीण पोलिसांनी सतर्क राहावे. पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येकाला चांगली वागणूक देताना आपल्या कार्यात सुधारणा करावी. अंमली पदार्थ हा चिंतेचा विषय झाला आहे. समाजातून अंमली पदार्थ संपवण्यासाठी झिरो टॉलरन्सचे धोरण अवलंबण्याची गरज आहे, असे दिलीप वळसे पाटील यांनी पोलिसांना सांगितले आहे.

7 हजार पोलिसांची भर्ती -5 हजार 200 पोलीस भर्तीची प्रक्रिया पूर्ण होत आहे. त्यामुळे आता 7 हजार पोलीस शिपाई भर्ती करण्याची प्रक्रिया सुरू ( Seven Thousand Posts Police ) होणार आहे. याशिवाय राज्याच्या विविध भागात 87 नवीन पोलीस ठाण्याचे बांधकाम सुरू असल्याची माहिती वळसे पाटील यांनी दिली आहे.

पोलिसांना गृहकर्ज देणार -पोलीस कर्मचाऱ्यांना घर बांधण्यासाठी गृहकर्ज उपलब्ध करून दिले जाणार असल्याचा निर्णय झाला आहे. मधल्या काळात घर बांधण्यासाठी कर्मचाऱ्यांना बँकेकडून कर्ज घ्यावे लागत होते. पण, आता तो निर्णय बदलून कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यात आला असल्याची माहिती गृहमंत्री वळसे पाटीलांनी दिली आहे.

हेही वाचा -Nanded Police Seized Swords : धुळ्यानंतर नांदेडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई; 25 तलवारी जप्त

ABOUT THE AUTHOR

...view details