नागपूर - राज्यातील मेडिकल कॉलेजच्या प्राध्यापकांनी विविध मागण्यासाठी मागील दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू केले आहे. पण, सरकारकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे अखेर आज ( सोमवार ) पासून नागपूरसह वैद्यकीय कॉलेजच्या प्राध्यापकांनी अत्यावश्यक रुग्णसेवा वगळता ओपीडी तपासणीचे काम बंद केले ( Medical College Professor Agitation ) आहे. राज्यभरातील सुमारे अडीच हजार प्राध्यापकांनी आंदोलनात सहभाग घेतला असून, नागपूर वैद्यकीय कॉलेजच्या डिन ऑफिससमोर घोषणा देण्यात आल्या.
अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांना स्थायी करावे. सातव्या वेतन आयोगानुसार भत्ते देण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. यात वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी 80 टक्के मागण्या मान्य केल्याचे अधिवेशनात सांगितले. मात्र, आमच्या संघटनेला अद्याप लेखी कळवले नसून आमच्या मागण्यांकडे साफ दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे आंदोलनाचा पवित्रा घेतल्याचे मेडिकल कॉलेजच्या प्राध्यापकांनी म्हटलं आहे.