महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

School Reopen Maharashtra : मेस्टाच्या निर्णयामुळे राज्यातील 'या' शाळा सुरु होणार

महाराष्ट्र इंग्लिश स्कुल ट्रस्टी असोसिएशनने ( Maharashtra English School Trustee Association ) राज्यातील 18 हजार शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. 10 आणि 12 च्या विद्यार्थी हितासाठी त्यांनी हा निर्णय ( Mesta School Reopen Maharashtra ) घेतला आहे.

School Reopen Maharashtra
School Reopen Maharashtra

By

Published : Jan 16, 2022, 7:50 PM IST

Updated : Jan 16, 2022, 8:08 PM IST

नागपूर -कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्याने राज्य सरकारने शाळा, महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय ( Corona Increased Maharashtra School Closed ) घेतला. मात्र, या विरोधात जाऊन महाराष्ट्र इंग्लिश स्कुल ट्रस्टी असोसिएशनने ( Maharashtra English School Trustee Association ) राज्यातील 18 हजार शाळा सोमवारपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. 10 आणि 12 वीच्या परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्यातचे मेस्टाकडून ( Mesta School Reopen Maharashtra ) सांगितले जात आहे.

राज्यातील 18 हजार शाळा मेस्टाशी जुळल्या आहे. दुसऱ्या लाटेनंतर शाळा सुरु झाल्या. तेव्हा 10 ते 12 वीच्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन शिक्षणामुळे वाचन आणि लिखाण क्षमता घटल्याचे निरीक्षणास आले आहे. तीन तास पेपर लिहताना त्यांना वेळ कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेस्टाने एक बैठक घेऊन शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

माहिती देनाता मेस्टाचे पदाधिकारी

याबाबत प्रशासनाला निवेदन दिले आहे. काही पालक संघटनांशी चर्चा केली आहे. पालकांनी मुलांना पाठवायचे की नाही हे ठरवायचे आहे. मेस्टाने शाळा सुरु करण्याच्या निर्णयाला पालकांना होकार दिल्याचे मेस्टा नागपूरचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. निशांत नारनवरे यांनी ईटीव्हीशी बोलताना सांगितले.

प्रशासनाच्या कारवाईला सामोरे जाणार, पण...

सर्वत्र हॉटेल मॉल सुरु असताना शाळा का बंद, असा प्रश्न शाळांकडून उपस्थित केला जात आहे. मुलांना परीक्षेला सामोरे जाताना सराव करणे गरजेचे आहे. त्यामुळे 50 टक्के नियम लावून शाळा सुरु करण्याची परवानगी प्रशासनाला मागितली आहे. त्यावर लेखी उत्तर न दिल्याने मेस्टाने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. गरज पडल्याल प्रशासनाच्या कारवाईला सामोरे जाण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे.

हेही वाचा -19 फेब्रुवारीला शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा स्थापन होणारच, राणा दाम्पत्याचा निर्धार

Last Updated : Jan 16, 2022, 8:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details