जळगाव -बंड पुकारलेल्या एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्यासह आमदारांना पुन्हा परत येण्याचे भावनिक आवाहन भडगावातील शिवसैनिकानी केले. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारून महाराष्ट्रातील शिवसेना आमदारांना गुवाहाटीत दाखल झालेत. या अनुषंगाने भडगावातील शिवसैनिक यांनी युवा सेना जिल्ह्या सरचिटणीस लखीचंद पाटिल याच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी असंख्य कार्यकर्त्यांनी आपले स्वतःचे रक्त काढून रक्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांना समर्थनाचे पत्र लिहून पाठविले.
रक्ताने लिहिलेले पत्र -तर दुसरे पत्र एकनाथ शिंदे यांनाही रक्ताने लिहिलेले पत्र लिहले. या पत्रात त्यांनी बंडखोर आमदारांना परत घेऊन येण्याची विनंती केली. यावेळी भडगावच्या छञपती शिवाजी महाराज चौकात शिवसैनिकानी जय भवानी, जय शिवाजी च्या घोषणा देत जोरदार शक्तिप्रदर्शन कोले. तर आम्ही शिवसैनिक मुख्यमंत्र्याच्या सोबत आहेत असे मत युवा सेना जिल्ह्या सरचिटणीस लखीचंद पाटिल यानी व्यक्त केले.