नागपूर - उपराजधानी नागपुरात महाजनकोला कोराडी आणि खापरखेडाच्या औष्णिक विद्युत केंद्रासाठी मिळणाऱ्या कोळश्यातील रिजेक्ट कोल हा खुल्या बाजारात विकला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रसचे नेते प्रशांत पवार यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केला आहे. यामध्ये महाजनकोचे अधिकारी, कोल वाशरीज कंपन्या आणि त्यांच्यावर देखरेखेसाठी असलेले खनिकर्म महामंडळाचे अधिकारी यांच्या संगनमताने हे सुरु असल्याचा दावा माहिती अधिकारातून मिळालेल्या कागपत्रांच्या आधारे केला आहे. या प्रकरणाची चौकशी राज्यसरकाने आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी करुन कोल वाशरीज कंपन्या 2007 प्रमाणे पुन्हा बंद कराव्यात, अशी मागणी प्रशांत पवार यांनी केली ( Mahagenco Coal Scam ) आहे.
महाजनकोला वीज निमिर्तीसाठी वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या ( डब्ल्यूसीएल WCL) कोळसा माध्यमातून मिळत असतो. पण, या कोळश्याचे उष्मांक हा कमी असल्याने कोल वाशरीजच्या माध्यमातून धुवून कोळसा उपयोगात आणल्यास उत्तम दर्जाचा जास्त कॅलरीक (उष्मांक) असलेला कोळसा मिळतो. त्यामुळे कमी कोळश्यात अधिक वीज निमिर्ती होते. तसेच, दुसरे कारण म्हणजे या औष्णिक केंद्रातील मशिन अद्यावत असल्याने त्यांना आयात केलेला कोळसा पाहिजे. पण, तो कोळसा लहाग असल्याने धुवून वापरल्यास ती गरज भागवल्या जाऊ शकते. त्यासाठी 2019 मध्ये कोल वाशरीज कंपनींना भाजप सरकारचे तत्कालीन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी परवानगी देत कोळशा धुवून घेण्यासाठी परवानगी दिली. त्यानंतर टेंडर झालेत. यात, सध्याच्या घडीला चार कोल वाशरीज कंपनीना हा कोळसा धुवून महाजनकोला देत आहे.
कोळसा धुणे म्हणजे नेमके काय होते -महाजनकोला मिळणारा कोळसा हा धुवून देण्यासासाठी कोलवाशरीज कंपनीची नियुक्ती करते. कोळसा खाणीतून मिळणारा कोळशात दगड, माती, शेल ( उष्मांक नसलेला पांढरा कोळसा ) यात असते. त्यामुळे या कोळश्याला स्वच्छ करून दगड, माती वेगळी केली जाते. त्यानंतर पाण्याने धुवून जास्त उष्मांकचा कोळसा वेगळा करत यापासून वीज निमिर्तीसाठी वापरला जातो. पण, यात माहिती अधिकारी मागितलेल्या आकडेवारीत या कोळश्यापासून कुठलाच फायदा झाला नाही. अथवा कोळसा धुतल्याने अधिक विज निमिर्ती झाली नाही, असा दावा प्रशांत पवार यांनी केला.
2007 मधील कोल वाशरीज 2019 मध्ये पुन्हा का सुरु - यापूर्वी वीज निर्मितीसाठी महानिर्मितीचे अधिकारी कोलवाशरीजचा उपयोग केला जात होता. पण, राज्यात 2007 मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकार असताना यात काही अधिकारी भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप होऊ लागले. त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली. त्यात कोल वाशरीजच घोळ समोर आला. त्यामुळे कोल वाशरीज अर्थात कोळशा धुवून वापरवण्यास बंद करण्यात आले. पण, 2019 मध्ये या कोल वाशरीजला पुन्हा परवानगी मिळाली. त्यात भ्रष्टाचाराचा आरोप होत असल्याने यांनी द्या चौकशी, असे माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे.