‘खेलो इंडिया’अंतर्गत पायाभूत सुविधेसाठी राज्याला 200 कोटींचा निधी द्यावा; क्रीडा मंत्री केदार
राज्यातील क्रीडा पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याकरीता प्रलंबित असलेल्या 37 प्रस्तावासाठी राज्याला खेलो इंडियामधून 200 कोटी रुपयांचा निधी मिळावा, अशी मागणी सुनील केदार यांनी केली. कांदिवली येथील क्रीडा संकुलसंदर्भात राज्य शासन आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) यांच्यामध्ये झालेल्या कराराप्रमाणे अंमलबजावणी करण्यासंदर्भात त्यांनी यावेळी रिजूजी यांच्यासोबत चर्चा केली.
नागपूर - खेलो इंडिया अंतर्गत राज्यातील विविध प्रलंबित असणाऱ्या पायाभुत सुविधांसाठी आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याला 200 कोटी रुपयांचा निधी मिळावा, अशी मागणी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांच्याकडे केली. मंत्री केंदार यांनी मंगळवारी दिल्लीत केंद्रीय क्रीडामंत्री रिजूजी यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील विविध क्रीडाबांबीवर चर्चा सुद्धा केली.
राज्यातील क्रीडा पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याकरीता प्रलंबित असलेल्या 37 प्रस्तावासाठी राज्याला खेलो इंडियामधून 200 कोटी रुपयांचा निधी मिळावा, अशी मागणी सुनील केदार यांनी केली. कांदिवली येथील क्रीडा संकुलसंदर्भात राज्य शासन आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) यांच्यामध्ये झालेल्या कराराप्रमाणे अंमलबजावणी करण्यासंदर्भात त्यांनी यावेळी रिजूजी यांच्यासोबत चर्चा केली. राज्य शासन आणि साईमध्ये झालेल्या कराराप्रमाणे कांदीवली येथील सराव शिबीर औरंगाबाद येथे व्हावेत, त्यासाठी राज्यशासनाने विनामुल्य जागा उपलब्ध करून दिली असल्याचेही केदार यांनी यावेळी रिजूजी यांना सांगितले.
विदर्भातील आदिवासी भागातील खेळाडुंना अधिक प्रोत्साहन मिळावे, यासाठी दुर्गम भागात केंद्र शासनातर्फे क्रीडा अकादमी सुरू करावी, असा प्रस्तावही सुनील केदार यांनी बैठकीत मांडला. यासह चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशा येथे क्रीडा संकुल बांधुन तयार आहे, हे संकुल साईने लीजवर घेऊन या भागातील खेळाडुंना प्रोत्साहन द्यावे, असा प्रस्ताव केदार यांनी केंद्रीय मंत्री रिजिजू यांच्या पुढे मांडला.