महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नागपूरात 'बिबट्याची' चकवेगिरी सुरूच; वन विभागाची शोधमोहीम सुरू - नागपूर लेटेस्ट

शहरात सहा दिवसांपूर्वी म्हणजेच शुक्रवारी सकाळी गायत्री नगर परिसरात एका घराच्या अंगणात बिबट्या दिसून आला होता. या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाची शोधमोहीम सुरु आहे.

वन विभागाची शोधमोहीम सुरू
वन विभागाची शोधमोहीम सुरू

By

Published : Jun 3, 2021, 2:00 PM IST

नागपूर- नागरी भागामध्ये शिरलेला बिबट्या आता नागपूरच्या मध्यवर्ती भागातील विभागीय आयुक्त परिसरात पोहोचल्याची शंका निर्माण झाली आहे. बुधवारी एका वाहन चालकाला रात्री साडेअकराच्या सुमारास एक वन्य प्राणी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या दिशेत रस्ता ओलांडतांना दिसून आला होता. या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाची शोधमोहीम सुरु आहे.

बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाची शोधमोहिम

सहा दिवसांपूर्वी झाले होते प्रथम दर्शन

संबंधित वाहन चालकाने त्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली, त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी त्या ठिकाणी शोधमोहीम केली. मात्र बिबट्या कुठेही दिसून आला नाही. हा बिबट्या सहा दिवसांपूर्वी म्हणजेच शुक्रवारी सकाळी सर्वप्रथम गायत्री नगर परिसरात एका घराच्या अंगणात दिसून आला होता. तेथून दुसऱ्या दिवशी रात्री अडीच वाजता तो आयटी पार्क जवळील एका सॉफ्टवेअर कंपनीच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून आला होता. या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाची शोधमोहीम सुरु आहे.

हेही वाचा -वाघांचा मार्ग अडवणे आले अंगलट; ताडोबा व्यवस्थापनाने बजावले चार जणांना कारणे दाखवा नोटीस

ABOUT THE AUTHOR

...view details