नागपूर -विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर आरोपांची सरबत्ती केली आहे. आज त्यांनी नागपूर विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधताना नवाब मालकांनीच सिक्रेट अहवाल फोडल्याचा आरोप केला आहे.
वाझे प्रकरणाने महाराष्ट्राची बदनामी, मलिकांसह महाविकास आघाडीचे नेते घाबरले आहेत - फडणवीस
फडणवीस म्हणाले, की महाराष्ट्राची बदनामी वाझे प्रकरणामुळे सर्वात जास्त झाली आहे. या करिता राज्य सरकार मधील वाझेंचे मालकच जबाबदार असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. नवाब मलिक चिंतेत आहेत, त्यांची चिंता स्वाभाविक असून फोन टॅपिंग रिपोर्टमध्ये अनेक लोकांचे बिंग फुटेल, अशी भीती त्यांना वाटत असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
फडणवीस म्हणाले, की महाराष्ट्राची बदनामी वाझे प्रकरणामुळे सर्वात जास्त झाली आहे. या करिता राज्य सरकार मधील वाझेंचे मालकच जबाबदार असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. नवाब मलिक चिंतेत आहेत, त्यांची चिंता स्वाभाविक असून फोन टॅपिंग रिपोर्टमध्ये अनेक लोकांचे बिंग फुटेल, अशी भीती त्यांना वाटत असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. माझा सवाल हा आहे की सिंडिकेट राज कोणी चालवले, दलाली कोणी खाल्ली, बदल्या कोणी केल्या, वाझेची सेवा ज्यांनी घेतली त्यांनी मुंबई पोलिसांची बदनामी केली की नाव केले?
वाझेंचे सर्व मालक याच चिंतेत -
वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे सर्व मालक चिंतेत असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. वाझे एनआयएला काय सांगेल, यामुळे महाविकास आघाडीमधील वाझेच्या मालकांची धाकधूक वाढलेली आहे. त्यामुळे काँग्रेससह तिन्ही पक्ष अस्वस्थ आहेत. कारण वाझेचे हे खरे मालक तेच आहेत.
सचिन सावंतांवर मी बोलणार नाही -
सचिन सावंतांना मी काय उत्तर द्यायचे, त्यांना राजकारणातलं काय समजतं? ते रोज काहीही बोलतात. त्यांना उत्तर देण्यासाठी आमचे राम कदम आहेत. ते त्यांना उत्तर देतील. मला त्यांना उत्तर द्यायची गरज नसल्याचे फडणवीस म्हणाले आहेत.
सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित -
डिव्हीआर, सीसीटीव्ही फुटेज गायब झाल्याबाबतचा आरोप होतो आहे. एकतर पोलिसांचे सीसीटीव्ही कोणी गायब केले तरी बॅकअपमध्ये सर्व फुटेज सर्व्हरला आहे. प्रायव्हेट फुटेज गायब होऊ शकते, पण पोलिसांचे नाही. अशी व्यवस्था आम्ही सरकारमध्ये असताना करून ठेवली आहे. एवढंच नाही तर त्या फुटेजचे मिरर इमेजिंग देखील तयार होतात आणि ते सर्व उपलब्ध आहे. हे फुटेज दोन ठिकाणी साठवले आहे. डिव्हीआरचीही व्यवस्था मी गृहमंत्री असताना केली आहे. डिजिटल फुटप्रिंट एक माणूस नष्ट करू शकत नाही.