नागपूर -राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मनी लाँड्रिंगमध्ये पैसे गुंतवणूक केल्याची तक्रार करणाऱ्या वकिलांना ईडीने नोटीस बजावली आहे. वकिलांच्या तक्रारीनंतर त्यांच्याकडे असलेले कागदपत्र घेऊन आज 11 वाजता ईडीने हजर राहण्यास सांगितले होते. यामुळे तरुण परमार हे मुंबईच्या ईडी कार्यालयात हजर झाले आहेत.
- वकील तरुण परमार यांच्याकडून तक्रार दाखल -
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात नागपूरचे वकील तरुण परमार यांनी काही दिवसांपूर्वी एक तक्रार ईडीला केली होती. यामध्ये अनिल देशमुख यांनी मोठ्या प्रमाणात मनी लाँड्रिंगमध्ये पैसे गुंतवले आहेत, असे तक्रारीत नमूद केले होते. विशेष म्हणजे मागील महिन्यात ईडीने नागपुरातील दोन सीएच्या घरावर छापे टाकले होते. हे पैसे याच सीएच्या माध्यमातून गुंतवल्याचे ईडीच्या तपासात पुढे आल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे तरुण परमार यांच्याकडे काय कागदपत्र आहेत, ते आज ईडीकडून तपासले जातील. या प्रकरणात अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसून येत आहे. यामध्ये वकील तरुण परमार यांनी आणखी एका मंत्र्याच्या तसेच काही अधिकाऱ्यांच्या संदर्भातसुद्धा ईडीकडे तक्रार केली आहे.
- परमबीर सिंह यांचे आरोप -