नागपूर -नागपूरच्या कपील नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 41 वर्षीय महिलेची हत्या झाली ( Nagpur lady school bus carrier Murder ) आहे. दीपा जुगल दास असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून ती शनिवार पासून बेपत्ता होती. दीपा दास या एका शाळेच्या स्कुल बसमध्ये वाहक म्हणून कामाला होत्या. शनिवारी अज्ञात आरोपीने दीपा यांची हत्या केल्यानंतर मृतदेह प्लास्टिक बॅग भरून एक निर्जन स्थळी फेकून ( lady bus carrier body found in plastic bag Nagpur ) दिला होता. रविवारी परिसरातील लोकांना मृतदेह दिसल्यानंतर या बाबत पोलिसांना सूचना देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवल्यानंतर आरोपीचा शोध सुरू केला आहे.
मृतदेह आढळला प्लास्टिक बॅगमध्ये - पोलिसांच्या माहितीनुसार हत्या झालेली महिला दीपा दास या कपिल नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत समर्थ नगरातच घर आहे. त्यांचे पती एका स्टील कंपनीत कामाला आहेत. रोजच्या प्रमाणे शनिवारी दीपा या स्कुल बसवर गेल्यानंतर दुपारी घरी परत येत असताना बेपत्ता झाल्या, रात्री उशिरा पर्यंत घरी परत न आल्याने कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला, मात्र त्या कुठेही आढळून आल्या नाही. रविवारी सकाळी त्यांचा मृतदेह एका प्लास्टिक बॅगमध्ये आढळून आला आहे. या बाबत कपिल नगर पोलिसांना माहिती समजताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले होते. पोलिसांनी दीपा यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवल्यानंतर तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दीपा यांच्या मित्राची चौकशी सुरू केली आहे.