महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Nagpur local body election धक्कादायक निकाल देणाऱ्या मतदारसंघातून 'या' उमेदवारांना बसणार धक्का? - नागपूर स्थानिक स्वराज्य मतदारसंघ निवडणूक

मागील काही निवडणुकीत भाजपला ओबीसी उमेदवार डावल्याचे परिणाम भोगावे लागले. यामुळे भाजपकडून ओबीसी उमेदवार (OBC Candidates of BJP in Nagpur election) देण्याची शक्यता जास्त असल्याने माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांचे नाव आघाडीवर आहे. विधानसभेत त्यांच्या नावाला दिल्लीतून कात्री लागल्याने यावेळी त्यांना दिल्लीतून पसंती मिळणार का याकडे लक्ष लागले आहे.

By

Published : Nov 19, 2021, 7:55 PM IST

Updated : Nov 19, 2021, 9:28 PM IST

नागपूर-नागपूर विधान परिषदेची निवडणूक ( past Nagpur local body election results ) नेहमीच धक्कादायक निकाल देणारी निवडणूक ठरली आहे. राजकीय घडामोडी पाहता काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दिवंगत राजीव सातव यांची पत्नी प्रज्ञा सातव (Rajeev Satavs wife Pradnya Satav) यांची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी विनंती केली आहे. त्याचा परिणाम नागपूर विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज संस्थाच्या मतदार संघातील निवडणुकीवर काय होईल, याविषयी राजकीय विश्लेषक, पत्रकार आणि लोकप्रतिनिधींचे मते जाणून घेऊ.



विधान परिषदेच्या नागपूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी निवडणुका ( Nagpur local body election ) जाहीर झाल्या आहेत. पक्षीय बलाबलाचे गणित चुकवत धक्कादायक निकाल देणाऱ्या मतदार संघात मताधिक्य पाहता भाजपचे पारडे नक्कीच जड आहे. पण, गुप्त पद्धतीने होणारे मतदान पाहता निकाल धक्कादायक ठरू शकतो, असे मत राजकीय विश्लेषक तथा पत्रकार कमलेश वानखडे (Kamalesh Wankhede on nagpur election ) यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केले.

धक्कादायक निकाल देणाऱ्या मतदारसंघातून 'या' उमेदवारांना बसणार धक्का?


मताधिक्य भाजपकडे...
विधान परिषदेच्या नागपूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात एकूण 556 मतदार आहेत. नागपूर महापालिका, नागपूर जिल्हा परिषद जिल्ह्यातील 20 नगर परिषद तसेच पंचायत आणि नगर पंचायतीतील सदस्य मतदान करणार आहेत. नागपूर महापालिकेत भाजपकडे नक्कीच बहुमत आहेत. मतदारसंघात भाजपचे पारडे कागदावर जड वाटताना काँग्रेसची बाजूही जिल्हा परिषदेत भक्कम आहे. तसेच ग्रामीण भागातील इतर छोट्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस भक्कम आहे. काँग्रेसचे मतांचे आकडेवारीचे गणित कमी आहे. भाजपची ताकद सुमारे 75 ते 90 मतांनी जास्त आहे. पण मतदारसंघाचा पूर्व इतिहास पाहता मतांची बेरीज नेहमीच मतपेटीतून जशीची तशी समोर येत नसते.



राजकीय तडजोड-
2017 ची निवडणूक तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (opposition leader in Maharashtra Legislative Assembly) यांनी तेव्हाचे विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत बोलून बिनविरोध केली होती. अचानकपणे अनेक वर्षपासून खस्ता खाल्लेले भाजपचे गिरीश व्यास (BJP MLA Girish Vyas) हे बिनविरोध निवडून आले होते. तेच मुंबईत भाई जगताप हे बिनविरोध निवडणून आले होते. गुरुवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भेट घेतली. या भेटीत काँग्रेस नेत्यांनी प्रज्ञा सातव यांची विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी विनंती फडणवीस यांना केली. यामुळे मागील वेळी झालेल्या राजकीय तडजोडीची पुनरावृत्ती होणार का असा प्रश्न आता समोर येत आहे.

हेही वाचा-GOA ASSEMBLY ELECTION 2022 मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल यांचे शक्तिप्रदर्शन; गरज पडल्यास कठीण संघर्षाचे दिले संकेत



भाजप देणार का नवीन चेहऱ्याला संधी...

मागील काही निवडणुकीत भाजपला ओबीसी उमेदवार डावल्याचे परिणाम भोगावे लागले. यामुळे भाजपकडून ओबीसी उमेदवार (OBC Candidates of BJP in Nagpur election) देण्याची शक्यता जास्त असल्याने माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांचे नाव आघाडीवर आहे. विधानसभेत त्यांच्या नावाला दिल्लीतून कात्री लागल्याने यावेळी त्यांना दिल्लीतून पसंती मिळणार का याकडे लक्ष लागले आहे. यात दिल्लीतून पसंती मिळाल्यास नागपूर आणि महाराष्ट्रातून त्यांचे नाव पुढे केले जाऊ शकते. यात दुसरे नाव नागपूर महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती वीरेंद्र कुकरेजा यांचे येत आहे. महत्त्वाचे म्हणजे ते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis closed Virendra Kukareja) यांचे विश्वासू आहेत. ओबीसी उमेदवार नाकारण्याची जोखीम भाजप घेण्यास तयार आहे का? यात बावनकुळे आणि कुकरेजा हे उमेदवार येत्या काळात दुसऱ्या जागवेरून निवडणूक लढविले जातील का? त्यांना डावलले जाईल का?

राजकीय तडजोडीमध्ये कोणाची लागणार लॉटरी?

अनेक वर्षापासून संघाशी निष्ठावान राहिलेल्या चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. राजकीय तडजोड झाल्यास ती लॉटरी कोणाला लागेल हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. अर्थात हे चित्र उमेदवारांची नावे जाहीर होताच स्पष्ट होईल.

हेही वाचा-Legislative Council Elections : मुंबईत काँग्रेसला फटका, तर भाजपाला फायदा !

काँग्रेसची काय परिस्थिती असेल?
काँग्रेसकडून या मतदारसंघातून उमेदवार कोण असणार याबद्दल अद्यापही तर्कवितर्क सुरू आहेत. काँग्रेसचे नागपूर जिल्हा अध्यक्ष आणि माजी मंत्री राजेंद्र मुळक उमेदवार यांच्याशिवाय दुसरे नावही फारसे चर्चेत नाही. त्याला दुसरे कारण म्हणजे काँग्रेससह महाविकास आघाडीची मतदार संख्या भाजपपेक्षा कमी आहे. यात 2012 च्या निवडणुकीत कागदावर भाजपची मतदार संख्या जास्त असतानाही काँग्रेसचे राजेंद्र मुळक अवघ्या चार मतांनी निवडून आले होते. निवडणूक झाल्यास काँग्रेसचे नेते राजेंद्र मुळक तो चमत्कार यावेळी घडविण्याच्या तयारीत तर नाही ना अशी चर्चा आहे. पण, त्यासाठी काँग्रेसचे तीन मोठ्या नेत्यांनी यांच्या नावाला पुढे करून ताकद लावण्याची गरज आहे. त्यामुळे विधान परिषदेची नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघातली ही निवडणूक अखेरच्या क्षणापर्यंत चुरशीची राहील अशीच शक्यता जास्त आहे.

निवडणुकीत भाजपचे मताधिक्य असणार!
या पूर्वीचे निकाल काहीही लागले असेल तरी यावेळी तफावत आहे. एखाद्या दोन-चार मतांचा हा खेळ नसून त्यापेक्षा जास्त मताधिक्य भाजपकडे आहे. त्यामुळे यात भाजपच निकालात अव्वल ठरेल अशी आशा स्थनिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे विद्यमान आमदार गिरीश व्यास यांनी व्यक्त केली.

हेही वाचा-KOLHAPUR ASSEMBLY ELECTION अमल महाडिक 'अशी' मारणार बाजी; चंद्रकांत पाटलांनी सांगितले कॅलक्युलेशन


फॉर्म्यूला की निवडणूक?
दरम्यान गेल्या वेळेला विधान परिषदेच्या मुंबई आणि नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातली निवडणूक सर्व पक्षांनी राजकीय तडजोड म्हणून बिनविरोध केली होती. पुन्हा एकदा सर्व पक्ष मिळून तो फॉर्म्यूला तर राबवणार नाही ना, अशी शक्यताही कायम आहे. यात गुरुवारी काँग्रेस नेत्यांनी घेतलेल्या बैठकीत विरोधीपक्ष नेत्यांनी होकार दिला नाही. असे असले तरी चित्र स्पष्ट होण्यास वेळ लागणार आहे. यात तडजोड न झाल्यास नक्कीच निवडणूक रंगतदार होणार आहे. उमेदवारांच्या नावाची घोषणा होताच बरेच चित्र स्पष्ट होईल हे तेवढेच खरे आहे.

Last Updated : Nov 19, 2021, 9:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details