नागपूर - आज जागतिक महिला दिन देशभरात साजरा होत असताना नागपुरातील गंगा जमुना (रेड लाईट) परिसरातील महिलांनी काळा दिवस पाळत पोलीस प्रशासनाच्या कारवाईचा निषेध केला. तसेच बलात्कार करणाऱ्या नाराधमांना बलात्कार करायचा असेल तर वारांगनाच्या वस्तीत या, पण सुसंस्कृत महिलांवर अत्याचार करू नका असे वादग्रस्त वक्तव्य वारंगणाच्या आंदोलनाच्या नेतृत्व करणाऱ्या राष्ट्रवादी अर्बन सेलच्या अध्यक्षा ज्वाला धोटे यांनी केले. त्या नागपूरच्या चंद्रशेखर आझाद चौकात वारांगना महिलांनी मानवी शृंखला तयार करून रस्ता रोको आंदोलना दरम्यान माध्यमांशी बोलत होत्या.
वारांगना वस्तीतील देह व्यापारावर बंदी घालत विविध प्रकरणात कारवाई करत गुन्हे दाखल केल्या जात आहे. यामुळे मागील आठ महिन्यांपासून पोलीस प्रशासनाच्या कारवाईमुळे व्यवसाय बंद पडल्याने वाद पेटलेला आहे. यात जागतिक महिला दिनाच्या पूर्व संध्येला 60 वर्षीय महिलेवर तडीपारीची कारवाई केल्याने निषेध व्यक्त कारण्यासाठी आंदोलन करण्यात आले आहे. यासाठी मानवी शृंखला तयार करून रस्ता रोको करून पोलीस प्रशासनाचा कारवाईचा निषेध केला.