महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर टीका करणाऱ्यांनी पाच वर्षांत काय केलं; जितेंद्र आव्हाडांचा विरोधकांना प्रतिप्रश्न - jitendra avhad in nagpur

गेल्या पाच वर्षात काहीही करू न शकलेला भाजप, आता मुख्यमंत्र्यांवर दबाव निर्माण टाकण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप आव्हाड यांनी केला. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषण परिपूर्ण असल्याचे आव्हाड म्हणाले.

jitendra avhad raises question on BJP
मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर टीका करणाऱ्यांनी पाच वर्षांत काय केलं; जितेंद्र आव्हाडांचा विरोधकांना प्रतिप्रश्न

By

Published : Dec 19, 2019, 4:40 PM IST

नागपूर - राज्यपालांच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना अनेक महत्त्वाच्या विषयांचा समावेश नसल्याचा आरोप झाला. या विषयावर विरोधकांनी सभात्याग करत गोंधळ घातला होता. यावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कडाडून टीका केली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर टीका करणाऱ्यांनी पाच वर्षांत काय केलं; जितेंद्र आव्हाडांचा विरोधकांना प्रतिप्रश्न

गेल्या पाच वर्षात काहीही करू न शकलेला भाजप, आता मुख्यमंत्र्यांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप आव्हाड यांनी केला. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषण परिपूर्ण असल्याचे आव्हाड म्हणाले.

हेही वाचा: महापोर्टल घोटाळा 'व्यापम'पेक्षाही मोठा - जितेंद्र आव्हाड

राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना, आव्हाड यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराशेजारी झालेल्या गोळीबाराच्या प्रकाराचा उल्लेख केला. त्यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला नव्हता का, असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला.

ABOUT THE AUTHOR

...view details