नागपूर -एसीबीचे आधीचे महासंचालक संजय बर्वे यांनी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात माजी जलसंपदा मंत्री अजित पवार यांना दोषी धरण्यात आले होते. मात्र एसीबीने या महत्वाच्या मुद्द्यांकडे नजरचुकीने दुर्लक्ष झाल्याचे सांगत परामबीर सिंग यांनी न्यायालयात दिलगिरी व्यक्त केली आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक परमवीर सिंह यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याविषयी एक जोड प्रतिज्ञापत्र सादर केले.
सिंचन घोटाळा प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे घुमजाव हेही वाचा... VIDEO: दारूसाठी वाटेल ते.. वाईन शॉपमधून बघायला म्हणून घेतलेल्या बाटलीसह तळीरामाने ठोकली धूम
सिंचन घोटाळ्याविषयी एसीबीने विदर्भ सिंचन महामंडळाला अहवाल मागितला होता. या अहवालात तत्कालीन जलसंपदा मंत्री हे विभागाच्या निर्णयासाठी जबाबदार असतात, असा अहवाल एसीबीला सादर केला होता. बर्वे यांनी या अहवालाच्या आधारे अजित पवार या घोटाळ्याला जबाबदार असल्याचे नोव्हेंबर 2018 च्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले होते. परंतु 20 डिसेंबरला परमवीर सिंह यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात हा अहवाल विचारात घेतला नव्हता, असे नमूद केले होते. मात्र, आता ती चूक आता एसीबीने दुरुस्त केली. बर्वे यांनी संबंधित अहवाल तपासला होता पण त्यातील माहितीचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात केला नाही, असे सिंह यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा... 'कोल्हापूरकरांनो, लक्षात ठेवा तुमचा फोन यमालाही लागू शकतो'