महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Badminton Player Malvika Bansod : नागपूरची फुलराणी मालविकाच्या बहारदार कामगिरीसमोर सायना नेहवाल गारद, जाणून घ्या मालविका हिचा प्रवास

नागपूरची फुलराणी म्हणून ओळख असलेली आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू मालविका बनसोड ( International badminton player Malvika Bansod ) हिने आज (गुरुवार) आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू आणि ऑलिम्पिक पदक विजेती सायना नेहवालला इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पराभूत ( Malvika Bansod beats Saina Nehwal ) करून संपूर्ण देशाचे लक्ष आपल्या बहारदार कामगिरीकडे वेधले आहे.

Badminton Player Malvika Bansod
आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू मालविका बनसोड

By

Published : Jan 13, 2022, 7:50 PM IST

नागपूर - नागपूरची फुलराणी म्हणून ओळख असलेली आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू मालविका बनसोड ( International badminton player Malvika Bansod ) हिने आज (गुरुवार) आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू आणि ऑलिम्पिक पदक विजेती सायना नेहवालला इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पराभूत ( Malvika Bansod beats Saina Nehwal ) करून संपूर्ण देशाचे लक्ष आपल्या बहारदार कामगिरीकडे वेधले आहे. आजच्या अभूतपूर्व विजयानंतर मालविक बनसोड हे नाव आज प्रत्येक बॅडमिंटन खेळ प्रेमींच्या परिचयाचे झाले आहे. पण ती कोण आहे, तिने कोणत्या स्पर्धा खेळल्या आहेत आणि कोणत्या जिंकल्या आहेत, ती बॅडमिंटनमध्ये कुणाला आदर्श मानते याबाबतचा सविस्तर आढावा घेणारा हा ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट.

आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू मालविका बनसोड हिची प्रतिक्रिया

आठ वर्षांची असताना केली खेळायला सुरुवात -

मालविका बनसोडचा जन्म १५ सप्टेंबर २००१ रोजी महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे झाला. मालविका लहान असताना तिच्या आई वडिलांनी खेण्याच्या उद्देशाने दिलेल्या बॅडमिंटन रॅकेट दिले होते. त्यानंतर ते रॅकेट कधीही तिच्यापासून दूर झालेच नाही. मालविका आठ वर्षांची असताना बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली.

आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू मालविका बनसोड

मालविकाचा बॅडमिंटन प्रवास -

  • दक्षिण आशियाई विभागीय स्पर्धेत विजयी -

मालविका ही डाव्या हाताने खेळते, त्यामुळे तिच्या खेळात नावीन्य आणि सातत्य दिसून येत होते. त्यामुळे तिच्या प्रशिक्षकांनी तिला विशेष कोचिंग दिलं. त्यामुळे तिने 13 वर्षांखालील आणि 17 वर्षांखालील वयोगटात राज्य चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपद पटकावले होते. 2018 मध्ये आशियाई ज्युनियर चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरण्यात अपयशी ठरल्यानंतर, तिने कॅनडातील जागतिक ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सलग दोन निवड स्पर्धा जिंकल्या. डिसेंबर 2018 मध्ये ती काठमांडू नेपाळ येथे दक्षिण आशियाई विभागीय 21 वर्षाखालील चॅम्पियनशिपमध्ये वैयक्तिक आणि सांघिक स्पर्धांमध्ये विजेती होती.

  • इंटरनॅशनल चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक -

2019 मध्ये मालविका अखिल भारतीय सिनिअर रँकिंग स्पर्धा आणि अखिल भारतीय ज्युनिअर रँकिंग स्पर्धा जिंकल्या आहेत. त्याच वर्षी, तिने बल्गेरियन ज्युनियर इंटरनॅशनल चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक जिंकले.

  • सुवर्णपदके जिंकली -

2021 मध्ये, ती ऑस्ट्रियन ओपन आंतरराष्ट्रीय मालिका खेळली पण उपांत्यपूर्व फेरीत स्पेनच्या क्लारा अझुरमेंडी विरुद्ध पराभूत झाली. तिने 2019 मध्ये मालदीव इंटरनॅशनल फ्युचर सिरीज बॅडमिंटन स्पर्धा आणि अन्नपूर्णा पोस्ट इंटरनॅशनल सिरीज, नेपाळ यांसारखी आंतरराष्ट्रीय विजेतेपदे जिंकली आहेत. एवढंच नाही तर मालविकाने ज्युनियर आणि सिनिअर श्रेणींमध्ये राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये अनेक सुवर्णपदके जिंकली आहेत.

लिन डॅनला मानते आदर्श -

दोन वेळा ऑलिम्पिक चॅम्पियन आणि पाच वेळा विश्वविजेता चीनचा लिन डॅनला ती आपला आदर्श मानते.

आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू मालविका बनसोड

बॅडमिंटनपट्टू मालविकाला मिळालेले पुरस्कार -

मालविकाला नाग भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. याशिवाय खेलो इंडिया टॅलेंट डेव्हलपमेंट पुरस्कार आणि टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम (टॉप्स) ऍथलीट पुरस्कारसह अनेक पुरस्कार तिला मिळाले आहेत.

आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू मालविका बनसोड

हेही वाचा -Malvika Bansod beats Saina Nehwal : इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत नागपूरच्या मालविकाने सायना नेहवालवर मिळवला विजय

ABOUT THE AUTHOR

...view details