नागपूर- कोरोनाचा संसर्ग देशातून दूर व्हावा यासाठी नागपूरचा आंतरराष्ट्रीय धावपटू अतुल चौकसे याने 'गो कोरोना गो दौड' सुरू केलीय. यात तो आपल्या घराच्या छतावर 51 किलोमीटर धावणार आहे.
कोरोनाच्या जनजागृतीसाठी आंतरराष्ट्रीय धावपटू अतुल चौकसे यांची 'गो कोरोना गो दौड' - अतुल चौकसे
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सोशल डिस्टस्टिंग ठेवणे, मास्क घालणे गरजेचे आहे. मात्र,तरीही काही नागरिक याचे पालन करताना दिसत नाही. नागरिकांच्यामध्ये कोरोनाबाबात गांभीर्य यावे, यासाठी विविध मार्गाने जनजागृती सुरु आहे. याच उद्देशानं जनजागृती करण्यासाठी अतुल चौकसेने गो कोरोना गो दौड सुरु केलीय.
देशात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालला आहे. या आजाराला रोखण्यासाठी लॉकडाऊनचे पालन करणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, मास्क घालणे गरजेचे आहे. मात्र,तरीही काही नागरिक याचे पालन करताना दिसत नाही. नागरिकांच्यामध्ये कोरोनाबाबात गांभीर्य यावे, यासाठी विविध मार्गाने जनजागृती सुरु आहे. याच उद्देशानं जनजागृती करण्यासाठी अतुल चौकसेने गो कोरोना गो दौड सुरु केलीय.
अतुल चौकसे हा आपल्या घराच्या छतावर ही 51 किलोमीटर धावण्याचा उपक्रम करतो आहे. शुक्रवारी सकाळी 6 वाजल्यापासून त्याने धावायला सुरुवात केलीय. 51 किलोमीटर अंतर मोजण्यासाठी त्याने जीपीएस सॅटेलाईट घड्याळ घातले आहे.