नागपूर -कोरोनाच्या जागतिक महामारीने कला क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना मोठा तोटा सोसावा लागला आहे. कलाप्रेमी आणि कलकार कोरोनाचा संकटाचा पडदा हटावा आणि त्यावर कलेचे सादरीकरण व्हावे अशी आशा व्यक्त करत आहे. यात राज्यसरकारने परवानगी दिली आहे, तरीही आलेली मरगळ दूर होण्यासाठी काही काळ प्रतीक्षा लागणार आहे. याचाच आढावा जागतिक कलाकार दिनी ईटीव्ही भारत कडून घेण्यात आला आहे.
यासाठी कलाप्रेमीनी त्यांच्या भूमिकेला व्यासपीठ दिल्याने आभार ही मानले आहे. नागपूरच्या कलाभूमीला मोठा इतिहास आहे. याच भूमीत 1985 मध्ये 65 वे नाट्य संमेलन झाले. त्यावेळी तयार करण्यात आलेली नटेश्वराच्या मूर्तीचे आजही नागपुचे जेष्ठ कलावंत प्रभाकर ठेंगळी यांच्याकडून जतन केले जात आहे. कला क्षेत्राचा इतिहास सांगताना प्रभाकर ठेंगळी म्हणतात की कलावंतामध्ये कलेप्रती असलेले समर्पण आजच्या काळात दिसत नाही. त्याचे कारण म्हणजे नवीन तरुणाईला मोबाईल किंवा नवीन जगातील डिजिटल प्लॅटफॉर्मवर यासारखे साधना पाहता कला क्षेत्राला व्यवसायिक स्वरूप आले. त्यामुळे आजकाल नवीन पिढीतील कलावंत मंडळी बदलत्या जगासोबत गतिमान झाले. पण सगळं काही झटपट मिळवण्याची घाई ती सुद्धा आज दिसून येत आहे.