महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

आयएमएसच्या पहिल्या टप्प्याला समर्थन - औद्योगिक संस्था... - Nagpur Aditya Thackeray Proposed Inter Model Station News

इंटर मॉडेल स्टेशन हा प्रकल्प खापरीत होण्यासाठी अडचण असून तो भविष्यात शहरासाठी योग्य होणार नाही. यासोबत हा प्रोजेक्ट जर खापरीमध्ये नेल्यास तेथे कंटेनर डेपो नाही. या प्रकल्पासाठी दररोज 300 ते 500 कंटेनर आजच्या घडीला उतरतात. या ठिकाणी इंटर मॉडेल स्टेशन निर्माण झाल्यास ते नागरिकांच्या सोयीचे होण्याऐवजी ते नागरिकांच्या अडचणीचे ठरू शकते. यासोबत वाहतूक वर्दळीमुळे अपघात होऊ शकतो.

industrial Institutions support for the first phase of ims
आयएमएसच्या पहिल्या टप्प्याला समर्थन - औद्योगिक संस्था...

By

Published : Feb 21, 2022, 4:57 PM IST

Updated : Feb 21, 2022, 6:34 PM IST

नागपूर - अजनी परिसरात प्रस्तावित असलेल्या इंटर मॉडेल स्टेशन येणाऱ्या पिढीसाठी अत्यंत आवश्यक असल्याचा दावा करत व्यापारी आणि औद्योगिक संघटनांनी याला पाठिंबा दिला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हा प्रोजेक्ट हलवला जाण्याची शक्यता वर्तवल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे. अजनी प्रकल्पाला म्हणजेच आयएमएस म्हणजे इंटर मॉडेल स्टेशन या प्रकल्पामुळे शेकडो झाडे तोडली जाणार असल्याचे म्हणत पर्यावरण प्रेमींनी या जागेचा वापरास विरोध केला आहे. तोच हा प्रकल्प दुसरीकडे म्हणजेच खापरी येथे व्हावा असा पर्याय सुचवला जात आहे.

आयएमएसच्या पहिल्या टप्प्याला समर्थन

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकल्पाची मुंबईतील आरेशी तुलना करून हा प्रोजेक्ट्स झाड तोडून बनवण्यापेक्षा दुसरीकडे बनवला जाऊ शकतो, असे म्हटल्याने वाद निर्माण झाला. यातच नागरिकांचा विरोध असले तर हा प्रोजेक्ट रद्द केला जाऊ शकतो, असे संकेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून व्यक्त केले जात असल्याने या प्रोजेक्टला व्यापारी आणि औद्योगिक अशा सात संस्थानी समर्थन दिले आहे. हा प्रकल्प शहराच्या विकासासाठी महत्वाचा असून यामुळे लोकांना एकाच ठिकाहून रेल्वेतून उतरताच शहरात जाण्यासाठी मेट्रो, बस आणि शहरातील इतर भागासाठी मोबिलिटी मिळेल, अशी सुविधा असणार आहे.

या ठिकाणी रेल्वेची कॉलनी

विशेष म्हणजे ही जागा रेल्वेची असून या ठिकाणी रेल्वेची कॉलनी आहे. त्यामुळे या जागेला अजनी वन म्हटले जाऊ शकत नाही. कारण वन म्हणजे फॉरेस्ट होते आणि हे जंगलाचा भाग नसून शहरातील वस्तीचा भाग आहे. येथे झाडे मोठे झाले म्हणून याला वन म्हणता येणार नाही, असेही म्हटले जात आहे.

खापरी येथे का होऊ शकत नाही

हा प्रकल्प खापरीत होण्यासाठी अडचण असून तो भविष्यात शहरासाठी योग्य होणार नाही. यासोबत हा प्रोजेक्ट जर खापरीमध्ये नेल्यास खापरित कंटेनर डेपो नसल्याने दररोज 300 ते 500 कंटेनर आजच्या घडीला उतरतात. या ठिकाणी इंटर मॉडेल स्टेशन निर्माण झाल्यास ते नागरिकांच्या सोयीचे होण्याऐवजी ते नागरिकांच्या अडचणीचे ठरू शकतात. यासोबत वाहतूक वर्दळीमुळे अपघात होऊ शकतो. त्यामुळे याचा फायदा न होता नुकसान होईल. शिवाय हा प्रोजेक्ट रद्द झाला तरी शहराचे भविष्यात नुकसान होईल. कारण हा प्रोजेक्ट आजची गरज वाटत नसली तरी भविष्यात फायदाचा ठरणारा आहे.

या प्रोजेक्टससाठी 7 ते 8 हजार झाडे तोडले जाण्याची शक्यता

खरेतर पर्यावरण प्रेमींचाही या प्रकल्पाला विरोध नसून अजनी परिसरात होत असलेलता प्रस्तावित जागेला विरोध आहे. या प्रोजेक्टससाठी 7 ते 8 हजार झाडे तोडले जाणार आहे. त्यात बरेच झाड हे हेरिटेज झाडे आहे. त्यामुळे या झाडाला विरोध केला जात आहे. पण यात औद्योगिक संघटनांनी या जागेच्या पहिल्याच टप्प्याला होकार दर्शवत तोडल्या जाणाऱ्या झाडांच्या तुलनेत कितीतरी अधिक झाडे लावले जाऊ शकतो म्हणत या प्रकल्पाला विरोध करण्याऐवजी याला समर्थन करावे, असेही आवाहन केले.

पुढे काय होणार याकडे लक्ष

इंटर मॉडेल स्टेशनच्या माध्यमातून निर्माण झालेला वाद पुढे वाढणार की मिटणार याकडे लक्ष लागले आहे. यात पर्यावरण मंत्री यांनी दिलेले हा प्रोजेक्ट दुसरीकडे हलवण्याचे संकेत असले तरी अद्याप निर्णय झाला नाही. मात्र निर्णय झाल्यावर खऱ्या अर्थाने हा प्रोजेक्ट् बनणार की रद्द होणार हे येत्या काही दिवसात कळेलच.

Last Updated : Feb 21, 2022, 6:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details