नागपूर : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि वर्तमानविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Opposition Leader Devendra Fadnavis ) यांच्या नागपुरातील निवासस्थानाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली ( Increased Security Outside The Residence ) आहे. गेल्या तीन दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्यासत्तांतर नाट्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणावरून देवेंद्र फडणवीस यांच्या घराच्या बाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. शिवसेनेच्या बहुसंख्य आमदारांनी शिवसेना पक्ष महाविकास आघाडीतून बाहेर पडावा, अशी मागणी केली आहे.
Devendra Fadnavis Residence Security : देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील निवासस्थानाबाहेर सुरक्षेत वाढ
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि वर्तमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Opposition Leader Devendra Fadnavis ) यांच्या नागपुरातील निवासस्थानाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात ( Increased Security Outside The Residence ) आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या सत्तांतर नाट्याच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्या घराच्या बाहेर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आलेली आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी सुरक्षावाढ : त्या पार्श्वभूमीवर राज्यात सत्तांतर होईल का? अशा चर्चांना उधाण आलेले आहे. तर दुसरीकडे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनीदेखील शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडेल, अशी तयारी दर्शवली. यामुळे राज्यात परत एकदा भाजप आणि शिवसेनेचे सरकार अस्तित्वात येईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळेच देवेंद्र फडणीस यांच्या नागपूर येथील निवासस्थानी सकाळी सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. यासंदर्भात भारतीय जनता पक्षाच्या एकाही पदाधिकाऱ्यांनी पुढे येऊन प्रतिक्रिया देण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे.